Wardha News: अतिवृष्टी व संततधार पावसाच्या परिणामी एकरी दोन ते तीन क्विंटलची उत्पादकता त्याबरोबरच मालाची प्रत देखील खालावल्याने बाजारात सोयाबीन हमीदरापेक्षा कमी दराने विकले जात आहे. सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपयांचा असताना हिंगणघाट (जि. वर्धा) बाजार समितीत अवघ्या ५०० ते ७५० रुपये क्विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. त्यामुळे शासनाने तत्काळ बाजारात हस्तक्षेप करीत हमीभावाने खरेदी करण्याची मागणी जोर धरत आहे. .आसोना (ता. मोर्शी, अमरावती) येथील दिनेश टिपरे हे कृषी विद्यापीठाच्या आदर्श गाव संकल्पनेतील शेतकरी आहेत. त्यांची सहा एकरावर सोयाबीन लागवड होती. त्यातून ९ क्विंटलची उत्पादकता मिळाली. एकरी सरासरी दीड क्विंटल इतकी उत्पादकता झाल्याचे त्यांनी सांगितले. लेहगाव (ता. मोर्शी, अमरावती) येथील सुभाष बरखाडे यांची स्थितीदेखील वेगळी नाही. त्यांची १२ एकरांवर सोयाबीन लागवड होती यातून दोन ते अडीच क्विंटलची उत्पादकता मिळाली असे ते सांगतात..Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्विंटलने.सध्या अमरावती बाजारात सोयाबीनची आवक वाढत १६ हजार क्विंटलच्या पुढे गेली आहे. ३८०० ते ४२०० रुपये क्विंटलने सोयाबीन विकले जात आहे. हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत दोन टक्क्यांपेक्षा अधिक कचरा आणि ओलावादेखील क्षमतेपेक्षा अधिक असलेल्या सोयाबीनची आवक होत आहे. त्यामुळे ५०० ते ७५० रुपये क्विंटलचा दर मिळाला..Soybean MSP Procurement: सोयाबीनसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० तारखेपासून नोंदणी सुरु होणार, कमी भावात सोयाबीन न विकण्याचे आवाहन.असा आहे खर्च...सोयाबीनला एकरी सोंगणी (काढणी) कामी ३००० ते ३२०० रुपये तर मळणी कामावर १५०० रुपये इतका खर्च होतो. ४५०० रुपयांचा एकरी खर्च केवळ काढणी आणि मळणीवर होत असताना उत्पादकता एकरी दोन क्विंटलपर्यंतची आहे. योग्य दर्जा आणि चार हजार रुपये क्विंटल दर अपेक्षित धरता दोन क्विंटलचे आठ हजार होतात. काढणी, मळणी आणि व्यवस्थापनावरील दहा हजार रुपयांचा खर्च वजा जाता यात दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे, असे शेतकरी सांगतात..पूर्वी प्रति बॅग १५०० रुपये मळणीचा खर्च होता. कापणी करून गंजी लावणे प्रति एकर २६०० रुपयांचा दर होता. आता मजुरी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच उत्पादकतेवर परिणाम झाला. त्याबरोबरच पावसाचा फटका बसत दर्जाही खालावल्याने बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे.सुभाष बरखाडे, शेतकरी, लेहगाव, अमरावती.आमच्या बाजार समितीमधील दिलीप हटवार या अडत्याने खरेदी केलेल्या सोयाबीनची प्रत अत्यंत खराब होती. ओलावा आणि कचरा अधिक असल्याने एका क्विंटलमधून चांगल्या प्रतीचे केवळ दहा किलो सोयाबीन मिळाले. त्यामुळे ५३२८ रुपयांचा दर असताना ५०० रुपये क्विंटलने खरेदी केली. सोयाबीनची प्रत खराब असल्याने याला सावळा असे म्हणतात. तसा उल्लेख खरेदीपट्टीवर अडत्याने करणे गरजेचे होते.ॲड. सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती, हिंगणघाट, वर्धा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.