Akola News: दर्जेदार सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी दिसत असले तरी पुढील हंगामात हेच सोयाबीन बियाणे म्हणून शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे वितरणातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. .राज्यातील विविध बाजार समित्यांत कंपन्यांनी बियाणे दर्जाच्या सोयाबीनची खरेदी चढ्या दराने सुरू केलेली आहे. पश्चिम विदर्भात वाशीम जिल्ह्यातील बाजार समित्या अशा सोयाबीन खरेदीसाठी कंपन्यांनी हेरल्या आहेत. महाराष्ट्रासह प्रामुख्याने मध्य प्रदेशातील कंपन्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बियाणे दर्जाच्या सोयाबीनची खरेदी करीत आहेत. .Soybean Price: सोयाबीन दर स्थिर; तसेच काय आहेत कापूस, टोमॅटो, शेपू आणि मटारचे आजचे बाजारभाव .अकोला बाजारात सोयाबीन सरासरी प्रति क्विंटल ४५६५ रुपयांनी विकले जात असताना बियाणे दर्जाच्या सोयाबीनला ५६९५ चा सरासरी दर मिळाला. वाशीम बाजारात बियाणे दर्जाचे सोयाबीन ४५५० ते साडेसहा-सात हजारांपर्यंत विकले जात आहे..सर्वसाधारण सोयाबीन आणि बियाणे दर्जाच्या सोयाबीनच्या भावामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे स्थानिक भागासह इतर जिल्ह्यांतूनही या सोयाबीनची आवक होत आहे. या हंगामात कंपन्यांनी हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी केलेली असून, अद्यापही खरेदी सुरू आहे. हेच सोयाबीन पुढील हंगामात सत्यप्रत (ट्रुथफुल) बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनक समस्या निर्माण होऊ शकतात..Soybean Procurement: सोयाबीन, उडीद विक्रीसाठी सांगलीत २०० शेतकऱ्यांची नोंदणी.गुणनियंत्रण यंत्रणेच्या भूमिकेकडे लक्षसध्या बाजारातून खरेदी होत असलेले सोयाबीन शेतकऱ्यांना पुढील हंगामात थेट बियाणे म्हणून विकले तर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. एकीकडे बीजोत्पादन कार्यक्रमातून योग्य बियाणे मिळावे म्हणून गुणनियंत्रण विभागाकडून साथी पोर्टलचा आग्रह होत आहे. दुसरीकडे मात्र थेट बाजारातून कंपन्या बियाण्यांसाठी सोयाबीन खरेदी करत आहे. आता यावर गुणनियंत्रण विभाग काही नियंत्रण ठेवणार का, याकडे सर्व घटकांचे लक्ष लागले आहे..बियाणे टंचाईची आवईयंदा पावसामुळे बियाण्यांचेही उत्पादन कमी आहे. त्याचा फायदा घेत कंपन्यांनी नोव्हेंबरमध्येच पुढील हंगामासाठी बियाणे बुकिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सहा ते सात प्रमुख कंपन्यांनी डिलर व सबडिलरमार्फत आगाऊ रक्कम घेऊन बुकिंग केल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे बियाणे व्यवहारातील नियमन, दरनिर्धारण आणि पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.