Pune News: राज्यात हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीला मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला ३० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून १५ नोव्हेंबरपासून खरेदीला सुरुवात होणार आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने दिली आहे..पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यात नाफेड आणि एनसीसीएफसाठी सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. सोयाबीनचा हमीभाव केंद्र सरकारने यंदा प्रति क्विंटल ५३२८ रुपये जाहीर केला. तसेच मुगाचा व उडदाचा हमीभाव प्रत्येकी ७७६८ रुपये व ७८०० रुपये जाहीर केला आहे..Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र.राज्यात नाफेडची खरेदी अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली या २२ जिल्ह्यांत होणार आहे. तर एनसीसीएफच्या माध्यमातून नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांत खरेदी होणार आहे..Soybean Procurement Registration: सोयाबीन खरेदी केंद्रांवर नोंदणीचे तीन-तेरा.शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने पाॅस मशिनद्वारे करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बॅंक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरिता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे..खरेदीकरिता एसएमएस आल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे-पाटील आणि संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.