Soybean Rate : चीनमधील घडामोडींमुळे सोयाबीनला बळकटी

चीनमधील नागरिक आता कोरोना निर्बंधाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने लादलेल्या निर्बंधामुळे येथील नागरिकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला (Soybean Rate) चांगला आधार मिळतो आहे. सोयाबीनला चीनची वाढती मागणी (Chinas Soybean Demand) आणि पामतेलाच्या दरातील (Palm Oil Rate) तेजीचा सोयाबीनला फायदा होत आहे. मात्र देशातील दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील वाढ कायम राहील्यास देशातही सोयाबीनचे दर सुधारण्यास मदत होईल, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन दरात वाढ होणार ?

चीनमधील नागरिक आता कोरोना निर्बंधाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने लादलेल्या निर्बंधामुळे येथील नागरिकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. चीनमधील महागाई तर वाढलीच शिवाय बेरोजगारीचा दरही ऐतिहासिक पातळीवर पोचला. त्यामुळे नागरिक सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. चीनमधील महत्वाच्या शहरांमध्ये नागरिकांनी निदर्शने सुरु केली. काही ठिकाणी पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमकीही घडून येत आहेत.

नागरिकांचा रोष लक्षात घेऊन ग्वांगझू आणि चोंगकिंग या शहरांमधील निर्बंध कमी केले आहेत. चीन सरकार इतरही शहरांमधील कोरोना निर्बंध कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनला मागणीही वाढत आहे. अमेरिकेतील निर्यातदारांना चीनसोबत १ लाख ३६ हजार टन सोयाबीन निर्यातीचे करार केले आहेत. तर अर्जेंटीनातील शेतकऱ्यांनी बुधवारच्या तुलनेत आज दुप्पट निर्यात सौदे केले.

Soybean Rate
Soybean Rate : आठवडाभरात सोयाबीन दरवाढीची शक्यता

तिकडे पामतेलाच्या दरातही वाढ झाली आहे. मागील आठवड्यातील निचांकी ३ हजार १७८ रिंगीट प्रतिटनावरून पामतेल सुधारले आहे. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. बुर्सा मेलिशिया एक्सचेंजवर पामतेलाच्या दरात मागील आठवड्यात चढ उतार पाहायला मिळाले. आज पामतेलाचे जानेवारी २०२३ चे वायदे ४ हजार १८९ रिंगीटने पार पडले. कालच्या तुलनेत दर आज काहीसे नरमले होते. पण दर तेजीतच आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत

चीनची मागणी वाढण्याची शक्यता आणि पामतेलाच्या दरातील वाढ, यामुळे मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारले आहेत. मागील आठवड्यातील निचांकी १४.२६ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून पामतेल काल १४.७१ डाॅलरवर पोचले होते. ते आज १४.६२ डाॅलरपर्यंत नरमले. तर सोयातेलाचे दरही जवळपास चार टक्क्यांनी कमी झाले होते. सोयातेलाचा कमाल दर काल ७४ सेंट प्रतिपाऊंडवर होता. तो आज ६९.२८ सेंटपर्यंत खाली आला. तर सोयापेंडच्या दरात मात्र काहीशी सुधारणा होऊन ४१९ डाॅलर प्रतिटनावर पोचला होता.

देशातील बाजारभाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातही काहीसे चढउतार सुरु आहेत. आज देशातील बाजारात जवळपास २ लाख ७० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. मध्य प्रदेशात दीड लाख क्विंटल तर महाराष्ट्रात एक लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी आले होते. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते.

देशातील दर कधी सुधरतील?

चीन सोयाबीनचा जगातील सर्वात मोठी ग्राहक आहे. चीनची मागणी वाढल्यास आणि खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराला आधार मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारल्यास देशातील दरही वाढू शकतात. शेतकऱ्यांना किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com