Vidarbha Market Update: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, खाद्यतेलाच्या किमतीत वाढ आणि सोयापेंडच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात उसळी पाहायला मिळत आहे. शनिवारी (ता. २) अमरावती बाजार समितीत सोयाबीनला ६३६५ रुपये प्रति क्विंटल असा हंगामातील सर्वाधिक दर मिळाला. तर सोमवारी (ता. ४) देखील ६३६१ रुपयांवर दर होते..चालू हंगामाच्या सुरुवातीला सुमारे ५३२८ रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या सोयाबीनमध्ये आता तब्बल १००० रुपयांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. बाजारात मागील काही दिवसांपासून आवक सातत्याने घटत आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे..Soybean Price Rise: सोयाबीन दरवाढीचा फायदा साठवणूकदारांना.पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेंडला वाढती मागणी असल्याने प्रक्रिया उद्योगांनी खरेदी वाढवली आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून दरात तेजी कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी आवक कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत दर स्थिर राहण्याची किंवा आणखी वाढण्याची शक्यता आहे..Soybean New Variety: सोयाबीनच्या एमएयूएस-७२५ वाणाची ‘वनामकृवि’च्या नावे नोंदणी.मात्र या दरवाढीचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मर्यादितच मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश शेतकऱ्यांनी कमी दरात सोयाबीन विक्री केली असल्याने सध्या वाढलेल्या दराचा लाभ मुख्यतः साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना आणि काही मोजक्या शेतकऱ्यांनाच मिळत आहे. दरम्यान, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता लक्षात घेता आगामी काळात दरातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..देशांतर्गत सोयातेलाच्या दरात सुधारणा आणि सोयापेंडच्या मागणीत वाढ झाल्यामुळे स्थानिक बाजारात तेजी दिसून येत आहे. आवक कमी असल्याने दर काही काळ टिकून राहण्याची शक्यता आहे.संजय जाजू, व्यापारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.