Ahilyanagar News: सोयाबीनची काढणी सुरू झाली असल्याने बाजारात आवक वाढत आहे. मात्र सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दर दिवसाला अडिचशे क्विंटलपर्यंत आवक होत असून, सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते चार हजार रुपये व सरासरी ३७५० रुपयांचा दर मिळत आहे..राज्यात सोयाबीनचे ४७ लाख २१ हजार ४८८ सरासरी क्षेत्र असून, यंदा ४९ लाख ९४ हजार ६६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा सरासरीच्या सहा टक्के अधिक पेरणी झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सोयाबीनचे १ लाख ७८ हजार ५०६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यंदा १ लाख ८५ हजार १६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती, संभाजीनगर,.Soybean Price: सोयाबीनचे दर दबावात; सरासरी ४१०० रुपये दर.जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांत सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. या वर्षी सोयाबीन काढणीला आलेल्या काळातच अतिवृष्टी पुराचा मोठा फटका बसला, प्रामुख्याने सोयाबीनचे क्षेत्र अधिक असलेल्या जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. सततच्या पावसाने पाणी साचून राहिल्याचाही फटका बसला आहे..Soybean Price: सोयाबीनचे दर दबावात; सरासरी ४१०० रुपये दर.पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात आवक सुरू झाली आहे. दादा पाटील शेळके बाजार समितीत दर दिवसाला आडीचशे क्विंटलपर्यंत आवक होत असून सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते चार हजार रुपये व सरासरी ३७५० रुपयांचा दर मिळत आहे..सोयाबीनचा दर्जा नाॅन एफएक्यू असल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. यंदा नुकसान होऊनही व उत्पादन कमी येऊनही दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.