Latur News: सोयाबीनचे दर पुन्हा एकदा हमीभावाच्या पुढे गेले असून सध्या बाजारात पाच हजार ते पाच हजार ४६० रुपये क्विंटलदरम्यान व्यवहार होत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेसोबतच्या कराराबाबतच्या चर्चेनंतर सहा हजार रुपयांपर्यंत गेलेले दर घसरून हमीभावापेक्षा खाली आले होते. मात्र दोन दिवसांतच दरांनी पुन्हा हमीभावाचा टप्पा ओलांडला..१० फेब्रुवारीला सोयाबीनला कमाल पाच हजार ३६६, तर किमान पाच हजार ६० रुपये दर मिळाला. ११ फेब्रुवारीला दरात आणखी घसरण होऊन कमाल दर पाच हजार २७१, तर किमान दर चार हजार ८६१ रुपये झाला..Soybean Price: ‘पॅनिक सेलिंग’मुळे सोयाबीन दबावात .त्यानंतर १३ फेब्रुवारीला दरात सुधारणा होऊन कमाल पाच हजार ४६० व किमान पाच हजार एक रुपये दर नोंदवला गेला. १४ फेब्रुवारीला कमाल दर पाच हजार ४१८, तर किमान दर चार हजार ९४३ रुपये राहिला..या काळात बाजारातील आवक सुमारे दहा हजार क्विंटलपर्यंत घसरली.चालू हंगामात सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात दरात वाढ होऊन १७ जानेवारीला प्रथमच हमीभावाचा टप्पा ओलांडण्यात आला होता..Soybean Prices: सोयाबीनचे भाव साडेसहाशे रुपयांनी कोसळले.मेसेजही नाहीत, खरेदी बंद पडली?सोयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या पुढे सरकल्यानंतर नाफेड व पणन मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली खरेदी केंद्र बंद पडल्यात जमा आहेत. एक दिवस भाव पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पुन्हा खरेदी केंद्राची आठवण झाली. सोयाबीनच्या विक्रीसाठी केलेल्या नोंदणीची माहिती तपासून पाहिली. .मात्र पणन मंडळाकडील खरेदी केंद्राकडून तर शेतकऱ्यांना मेसेजही पाठवले नसल्याचे दिसून आले. ‘नाफेड’कडून मात्र, हे मेसेज मागील महिन्यापर्यंत येत होते. यामुळे खरेदी केंद्र बंद तर पडली नाहीत ना, अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.