Soybean Bajarbhav Update: यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका सोयाबीनच्या उत्पादकतेला बसल्याने बाजारातील आवक मर्यादित राहिली आहे. दुसरीकडे प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीनची मागणी वाढत असल्याने बाजारभावात वाढ आली आहे. सध्या विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर प्रति क्विंटल सात हजार रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. .काही बाजारांत कमाल दर ७५०० रुपयांपर्यंत मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५७०८ रुपये प्रति क्विंटल हमीभावाच्या तुलनेत बाजारात अधिक दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत..Soybean Utpadak Shetkari: सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात.दिवाळी सणानिमित्त सहा नोव्हेंबरपासून बाजार समित्यांमधील धान्य यार्डमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. १२ नोव्हेंबरला बाजार पुन्हा सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू सुधारणा होत गेली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्या दिवशी सोयाबीनला प्रति क्विंटल ६८०० ते ७१६१ रुपये दर मिळाला. त्या दिवशी केवळ १७६० पोत्यांची आवक झाली होती..त्यानंतर १३ नोव्हेंबरला आवक वाढून ३५६९ पोत्यांवर, तर १४ नोव्हेंबरला ३२९० पोत्यांवर पोहोचली. मात्र दरातील सुधारणा कायम राहिली. सोमवारी (ता. १६) अमरावती बाजार समितीत सोयाबीनला ७१०० ते ७४०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ७२५० रुपये प्रति क्विंटल राहिला. या दिवशी आवक वाढून ५८७५ पोत्यांवर पोहोचली होती. मंगळवारीही (ता. १७) बाजारातील दर सात हजार रुपयांच्या पुढे कायम राहिले..Soybean Rate Update : सोयाबीन बाजारात मोठी उलथापालथ! आवक कमालीची मंदावली.यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील सोयाबीनची उत्पादकता घटली आहे. अनेक भागांत अपेक्षित उत्पादन हाती आलेले नाही. परिणामी, शेतकऱ्यांकडील विक्रीयोग्य सोयाबीनचे प्रमाणही कमी आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. दुसरीकडे तेल उद्योगांसह सोयापेंड निर्मिती करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांकडून मागणी कायम असल्याने उपलब्ध मालासाठी बाजारात स्पर्धा निर्माण झाली आहे..मर्यादित आवक आणि वाढती मागणी या समीकरणातून सोयाबीनच्या दरांना आधार मिळत आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, चांदूरबाजार, काटोल, कारंजा आणि शेगावसह विविध बाजार समित्यांमध्येही सात हजार रुपयांच्या पुढे दर मिळत आहेत. त्यामुळे हमीभावापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे..विदर्भातील सोयाबीनचे बाजारभाव (रुपये प्रति क्विंटल)यवतमाळ ६१०० ते ७५५५अकोला ६००० ते ७४४०चांदूरबाजार ७०५० ते ७६००काटोल ६२०० ते ७४५०कारंजा ७३४० ते ७४५०शेगाव ६१२५ ते ७३००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.