Latur News: ‘सकाळ अॅग्रोवन’मध्ये शुक्रवारच्या (ता. १६) अंकात सोयाबीन हमीभावाचा टप्पा गाठणार असल्याचे अभ्यासकांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे. येथील अडत बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावाने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. .सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये असून बाजारात सोमवारी (ता. १९) सोयाबीनला कमाल ५ हजार ४०५ रुपये, किमान ४ हजार ९७० रुपये, तर सर्वसाधारण ५ हजार २५० रुपये क्विंटल भाव मिळाला. शनिवारी (ता. १७) सोयाबीनला कमाल भाव ५ हजार ३५० रुपये, तर शुक्रवारी (ता. १६) हाच भाव ५ हजार ३३७ रुपये होता. परिणामी, बाजारात सोयाबीनची आवक वाढली असून ती १७ हजार क्विंटलच्या जवळ पोहोचली आहे..Soybean Prices: सोयाबीनच्या दरामध्ये उसळी.देशात सोयाबीनचा पुरवठा आणि सोयापेंडचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त सोयापेंड कमी असून निर्यात आठ लाख टनांवरच स्थिरावणार आहे. त्यापैकी पाच लाख टन सोयापेंड डिसेंबरपर्यंत निर्यात झाली आहे. या सर्व घडामोडींचा आधार सोयाबीनच्या बाजारभावातील वाढीवर होणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला होता. यातूनच सोयाबीनचे भाव हमीभावाचा टप्पा गाठणार असल्याचे भाकीत अभ्यासकांनी व्यक्त केले होते..Soybean Rate: सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदी भाव पोचले ५५०० रुपयांवर.हे भाकीत लागलीच सत्यात उतरले असून लातूरमध्ये शुक्रवारीच सोयाबीनच्या भावाने हमीभावाचा टप्पा ओलांडला. यामुळे बाजारात सोयाबीनची रोजची आवक दोन ते अडीच हजार क्विंटलने वाढली आहे. भाववाढ व आवक येत्या काळात आणखी वाढेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे..सोयाबीन भावातील चढ-उतारदिनांक आवक कमाल भाव किमान भाव सर्वसाधारण भाव१२ जानेवारी १४ हजार ६०५ ५ हजार १५७ ४ हजार ६५० ५ हजार ५०१३ जानेवारी १५ हजार ४१११ ५हजार १८० ४ हजार ६०० ५ हजार ५०१६ जानेवारी १५ हजार ९५६ ५ हजार ३३७ ४ हजार ६५६ ५ हजार१७ जानेवारी १६ हजार ९१५ ५ हजार ३५० ४ हजार ९४५ ५ हजार १५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.