Market Bulletin:सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिरावले आहेत. सध्या सोयाबीनचा भाव हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. सध्या सोयाबीनला प्रक्रिया प्लांट्सकडून प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तर बाजार समित्यांमध्ये ७ हजारांच्या दरम्यान विक्री होत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे आधार आहे. मात्र वाढलेल्या भावात सोयाबीनचा उठाव काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे या पातळीवर दर स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस भाव स्थिरकापसाच्या भावातही स्थिरता आली आहे. कापसाने उचांकी १० हजारांचा टप्पा पार केल्यानंतर दर स्थिरावले आहेत. यापेक्षा जास्त दर दिसत नाहीत. सरासरी दरपातळी ९ हजारांच्या दरम्यान आहे. कापसाला उठाव आहे. तर बाजारातील आवक कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव तेजीत आहे. यामुळे देशातील बाजाराला याचा आधार मिळत आहे. कापसाला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. पाॅलिस्टरच्या वाढत्या दरामुळे कापसाची मागणी पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचा भाव तेजीतच राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कापूस भाव तेजीतच; सोयाबीन तेजीत, कांदा व हरभरा दबावातच तर ज्वारी आवक सुधारली.हळदीची आवक टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसत आहे. सध्या बाजारात हळद प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारात आवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: हळदीचा भाव स्थिर; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसातील तेजी टिकून, लिंबू आवक घटली तर काकडीला उठाव.ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .डाळिंब आवक कमी राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता कमी आहे. यामुळे डाळिंबाचा भाव सध्या टिकून आहे. डाळिंबाला बाजारात सध्या गुणवत्तेप्रमाण ६ हजारांपासून ते सरासरी १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे. काही बाजारांमध्ये उच्चांकी १६ ते २० हजारांचा भाव दिसत आहे. पण हा भाव गुणवत्तापूर्ण मालाला मिळत आहे. इतर माल १० हजारांच्या खालीच विकला जात आहे. तरीही कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दर टिकून आहे. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज डाळिंबा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.