Market Bulletin: सोयाबीनला उठावसोयाबीनचा भाव देशात टिकून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहे. तरीही सोयाबीनची भावपातळी एका मर्यादेत कमी जास्त होत आहे. सोयातेल आणि सोयापेंडच्या भावातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशात सध्या सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस तेजीतच देशातील बाजारात कापसाचा भाव तेजीतच आहे. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसत असले तरी सरासरी भावपातळी कायम आहे. कापसाला वाढलेल्या पाॅलिस्टरच्या भावाचा आधार मिळत आहे. पाॅलिस्टरचा भाव काहीसा कमी अधिक होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत. सध्या देशातील बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सराससरी ८ हजार ५०० ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील कापसाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सोयाबीन स्थिर, कापसाला उठाव, लसूण टिकून तर आंबा आवक वाढली.कांदा दबावातचकांद्याचा भाव दबावात असल्याने शेतकरी आंदोलने करत आहेत. मात्र तरीही कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील कांदा आवक चांगली सुरु आहे. आवकेच्या दबावामुळे भाव कमी दबावात असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावावरील दबावही राहण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात कांदा प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १ हजार रुपयाने विकला जात आहे. केंद्र सरकार कांदा खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देण्याची शक्यता आहे. याचा कांदा दराला काहीसा आधार मिळू शकतो, असा आशावादही अभ्यासक व्यक्त करत आहेत. .Agrowon Podcast: तुरीच्या भावावरील दबाव कायम; सोयाबीन टिकून, कापूस स्थिर, जांभळाला मागणी तर ज्वारी आवक सुधारली.आले दराला आधारराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आल्याची आवक काहीशी कमी झाली आहे. तर दुसरीकडे आल्याला चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे आल्याची आवक मंदावल्याचे व्यापारी सांगत आहेत. आल्याच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. सध्या आले बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. पुढील काळात बाजारातील आवकेवर पावसामुळे परिणाम शक्य असल्याचे सांगितले जाणकारांनी सांगितले. याचा आधार आल्याचा भावाला मिळू शकतो. .लिंबू दरात नरमाईराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. बाजारातील लिंबाची आवक मात्र कमीच आहे. तरीही लिंबाचा भाव काहीसा नरमला आहे. वाढलेल्या उन्हामुळेही मागणी वाढलेली आहे. सध्या बाजारात लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हाचा लिंबू पिकावर परिणाम दिसून येत आहे. लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.