Market Bulletin:सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सचा सोयाबीन खरेदीचा भाव क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी कमी झाला होता. सोयापेंडचे भाव वाढल्यानंतर निर्यात कमी झाली होती. याचा दरावर परिणाम दिसत आहे. आज प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ७ हजार ४०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रितिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनचे भाव काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसाला उठाव कायमकापसाला मागणी स्थिरावल्याने दरही स्थिर दिसत आहेत. देशातील बाजारात कापसाची आवक कमी झालेली आहे. तर मागणी वाढल्याने कापसाचा भाव सुधारला आहे. कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा टिकून आहे. कापसाला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काही बाजारांमधील कमाल भाव १० हजारांवर आहेत. पण सर्वच कापसाला हा भाव मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव टिकून आहे. याचा आधार देशातील कापसाला आहे. कापसाचा भाव पुढील काही दिवसांमध्ये टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर.शेवगा स्थिरावलाराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक स्थिरावली आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यामुळे भावातही काहीशी सुधारणा दिसून आली. शेवग्याला उठावही चांगला आहे. त्यामुळे शेवगा ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिरावण्याची शक्यता आहे. तर शेवग्याची मागणीही टिकून राहण्याचा अंदाज आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेवग्याच्या आवकेवरही परिणाम होण्याची शक्यता भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन भावात सुधारणा; कापूस तेजीतच, कांदा दबावातच, आल्याचे भाव टिकून तर शेवग्याला उठाव.लिंबू दरात नरमाईराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. बाजारातील लिंबाची आवक मात्र कमीच आहे. तरीही लिंबाचा भाव काहीसा नरमला आहे. वाढलेल्या उन्हामुळेही मागणी वाढलेली आहे. सध्या बाजारात लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हाचा लिंबू पिकावर परिणाम दिसून येत आहे. लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .मक्याचा भाव दबावातचदेशातील बाजारात मक्याचा भाव दबावात आहे. मक्याचा भाव हमीभावापेक्षा १५ ते २० टक्के कमी आहे. मक्याची बाजारातील आवकही चांगली सुरु आहे. सरकारने नव्या हंगामातील मक्याचा हमीभाव केवळ १० रुपयांनी वाढवला आहे. मक्याला उठाव मात्र स्थिर असल्याने भावपातळी दबावात आहे. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी १७०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आवक पुढील काही काळ चांगली राहण्याची शक्यता आहे. याचा दरावर दबाव राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.