Soybean Price: अपेक्षित दर नसल्याने सोयाबीन नेले परत
Khamgaon Soybean Market: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली असली, तरी दर अपेक्षित नसल्याने शेतकरी नाराज आहेत. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला माल परत नेण्याचे प्रकारही या आठवड्यात दोन वेळा झाल्याचे दिसून आले.