Cotton Import Duty: कापड उद्योगांना स्वस्त कापूस मिळण्यासाठी ११ टक्के आयात शुल्क काढा : कापड उद्योगाची अर्थमंत्र्यांकडे मागणी

Northern India Textile Mills Association: देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे देशातील कापड उद्योगाला स्वस्त कापूस मिळण्यासाठी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढा.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे देशातील कापड उद्योगाला स्वस्त कापूस मिळण्यासाठी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढा. तसेच चीनमधून आयात होणाऱ्या कपड्यांच्या किमती कमी दाखवून शुल्क चुकवले जात आहे. त्यावर तोडगा काढून देशातील कापड उद्योगाला संरक्षण द्यावे, अशी मागणी नाॅर्दर्न इंडिया टेक्सस्टाईल मिल्स असिसोएशन अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे केली आहे.

कापसाच्या बाजारभावाचा मुद्दा कापड उद्योग आणि सुतगिरण्यांनी अनेकदा सरकारकडे मांडला. उद्योगांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव मगाील दोन हंगामापासून कमी आहेत. देशात भाव जास्त आहेत. त्यामुळे उद्योगांना जास्त किमतीत कापूस खरेदी करून कापड निर्मिती करणे तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे देशातील कापूसही स्वस्त व्हावा. त्यासाठी सराकरने आयात खुली करावी. सरकारने आयात शुल्क काढावे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस देशात येईल आणि भाव कमी होतील, अशी मागणी उद्योगांनी केली आहे.

Cotton Market
Cotton Production: कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर 'सीएआय'चा सुधारित अंदाज जाहीर; आयात वाढली!

सरकारने २०२१ मध्ये देशातील शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळावे यासाठी ११ टक्के आयात शुल्क लावले आहे. मागील तीन वर्षात कापड उद्योगांनी अनेकदा सरकारने हे आयात शुल्क काढण्यासाठी लाॅबींग केले. मात्र सरकारने उद्योगांच्या या मागणीला केराची टोपली दाखवली. यंदाही कापड उद्योगाने सरकारकडे ही मागणी लावून धरली.

Cotton Market
Cotton Market : महाराष्ट्रात ओळख मिळविलेली मानवतची कापूस बाजारपेठ

उद्यागांचे म्हणणे आहे की, देशात भाव जास्त असल्याने निर्यात करता येत नाही. तसेच कापड निर्यातीतही अडचणी येत आहे. त्यामुळे सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढावे. तसेच चीनमधून देशात तयार कपड्यांची आयात होत असते. या आयात कपड्यांच्या किमती कमी दाखवून शुल्क आणि कर चुकवेगिरी केली जात आहे. याचा परिणाम देशातील कापड उद्योगाच्या विक्रीवर होत आहे. त्यामुळे सरकारने यावर कायमस्वरुपी तोडगा काढून चीनमधून होणाऱ्या कापड आयातीवर शुल्क आकारणी नियम कडक करावेत, अशीही मागणी उद्योगांनी केली आहे.

शेतकरी अडचणीत

यंदा कापूस बाजारात मंदी आहे. शेतकऱ्यांना मागील काही वर्षातील कमी भाव मिळत आहे. उत्पादनही कमी आहे. त्यामुळे सध्या बाजारात मिळणाऱ्या भावातून कापसाचा उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी कापसाचे भाव वाढवण्याची मागणी करत आहेत. पण उद्योगांकडून उलट भाव कसे कमी करता येईल, यासाठी लाॅबिंग सुरुच आहे. सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढू नये किंवा कमी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com