Chana Procurement : जालन्यात हरभरा विक्रीसाठी १२६१७ शेतकऱ्यांची नोंदणी

जालना जिल्ह्यासाठी आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी हेक्टरी १४ क्विंटल ५५ किलो हरभरा खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे
Chana Rate
Chana RateAgrowon

Chana Market Update जालना : जिल्ह्यात आधारभूत किमतीने (Chana MSP) हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून १२ केंद्रे मंजूर असून, यापैकी दहा केंद्रांवर १२६१७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.

जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, मंठा, माहोरा, जवखेडा खुर्द, अनवा, बदनापूर, मासेगाव, परतूर, रामनगर, जाफराबाद आदी ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी दहा केंद्रे २८ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान सुरू करण्यात आली आहेत.

Chana Rate
Chana Market : नाफेडच्या खरेदीमुळे हरभरा दरवाढीला आधार मिळणार?

या केंद्रावरून नोंदणी केलेल्या १२६१७ शेतकऱ्यांमध्ये जालना केंद्रावरील ४१५८, अंबड ९३, भोकरदन ९३९, मंठा २७६०, माहोरा १५२५, अनवा ५९१, बदनापूर ४८२, मापेगाव ३५२, परतूर ६४५, जाफराबाद १०७२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांपैकी जालना केंद्रावरून १३, भोकरदन केंद्रावरून १००, मंठा केंद्रावरून ५०, माहोरा केंद्रावरून ४००, बदनापूर केंद्रावरून एक आणि जाफराबाद चंद्रावरून एक मिळून ५६५ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

Chana Rate
Chana Market : हरभरा दरात सुधारणा होईल की नाही?

उर्वरित १२ हजार ५२ शेतकऱ्यांना अजून एसएमएस पाठविणे बाकी आहे. एसएमएस पाठविल्यानंतर मंठा येथील केंद्रावरून १५ शेतकऱ्यांतील ३१३.५० क्विंटल हरभरा ५३३५ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला असल्याचेही श्री. हेमके यांनी कळविले आहे.

जालना जिल्ह्यासाठी आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी हेक्टरी १४ क्विंटल ५५ किलो हरभरा खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे प्रत्यक्षात जालना जिल्ह्यात एकरी पाच ते दहा क्विंटलपर्यंत हरभरा उत्पादन येते. त्यामुळे उत्पादकता किंचित अडचणीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com