Onion Market : नगर जिल्ह्यात कांद्याला २८०० रुपयांपर्यंत दर

Onion Rate : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीसह पारनेर, राहुरी, श्रीरामपूर व अन्य बाजार समित्यांत कांद्याला गुरुवारी (ता. ३०) २८०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nagar News : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीसह पारनेर, राहुरी, श्रीरामपूर व अन्य बाजार समित्यांत कांद्याला गुरुवारी (ता. ३०) २८०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. बाजारात कांद्याची आवकही वाढली आहे. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याची आवक झाली.

प्रतवारीनुसार एक नंबर कांद्यास २२०० ते २८५०, दोन नंबरला १५०० ते २२००, तीन नंबरला ९०० ते १५००, चार नंबरला ४०० ते ९०० दर आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. कांद्याच्या भावात आज चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे चेहरे खुलले आहेत. आणखी भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Onion Market
Onion Export Duty : ‘बंगलोर रोझ’ कांद्यावरील निर्यात शुल्क हटविले

श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या आवारात गुरुवार (ता. ३०) कांद्याची चांगली आवक झाली. एक नंबर कांद्याला १२०० रुपयांचा दर मिळाला. येथील बाजार समितीत ७७ वाहनांतून मोकळा कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांनी आणला होता.

यामध्ये कांद्याला किमान २५०, तर कमाल १३०० रुपये भाव मिळाला. लूज कांद्यास एक नंबरला ११०० ते १३००, दोन नंबरला ७०० ते ११००, तीन नंबरला २५० ते ७००, गोल्टीला १००० ते १२०० रुपये दर मिळाला.

Onion Market
Onion Rate: केंद्र सरकारने कर्नाटकच्या कांद्यावरचे निर्यातशुल्क हटवले

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील उपबाजार समितीच्या आवारात २८०० रुपये दर मिळाला. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये ३२ वाहनांतून कांदा आवक झाली. त्यास २०८० रुपये दर मिळाला.

एक नंबर कांद्याला १८५० ते २०८० रुपये, दोन नंबरला १५०० ते १८०० रुपये, तीन नंबरला ९०० ते १४५० रुपये, तर गोल्टीला ९०० ते १३५० रुपये भाव मिळाला. वांबोरी उपबाजार समितीत ८३१४ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यास किमान २०० ते कमाल २८०० रुपयांचा भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com