Commodity Market Update : सोयाबीन, कापूस, मका, तूर उत्पादन घटणार

Kharif Crop Production : एनसीडीईएक्समध्ये १ नोव्हेंबर पासून फक्त मक्यासाठी नवीन करार उपलब्ध झाले आहेत. २० मार्च डिलिवरी साठी हे करार करणे शक्य आहे.
Cotton Soybean
Cotton SoybeanAgrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमतीः सप्ताह- २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२३

एनसीडीईएक्समध्ये १ नोव्हेंबर पासून फक्त मक्यासाठी नवीन करार उपलब्ध झाले आहेत. २० मार्च डिलिवरी साठी हे करार करणे शक्य आहे. त्यामुळे सध्या मक्यासाठी २० नोव्हेंबर, २० डिसेंबर, १९ जानेवारी, २० फेब्रुवारी व २० मार्च डिलीवरीसाठी व हळदीसाठी २० नोव्हेंबर व १९ एप्रिल डिलीवरीसाठी व्यवहार करणे शक्य आहे. कापसासाठी एमसीएक्समध्ये फक्त ३० नोव्हेंबर व ३१ जानेवारी डिलीवरीसाठी तर कपाशीसाठी ३० नोव्हेंबर, २९ फेब्रुवारी व ३० एप्रिल डिलीवरीसाठी व्यवहार चालू आहेत.

केंद्र शासनाने २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या पहिल्या अंदाजानुसार मका, तूर, मूग, सोयाबीन व कापूस या पिकांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी असेल. ऑक्टोबरमध्ये अमेरिकी शेती खात्याने (यूएसडीए) जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार कापसाचे जागतिक उत्पादन या वर्षी ३.१ टक्क्यांनी कमी झालेले असेल; सोयाबीनचे जागतिक उत्पादन मात्र ७.९ टक्क्यांनी वाढेल.

या अंदाजापेक्षा काहीसा वेगळा कल आवकेत दिसून येत आहे. भारतातील सर्व बाजार समित्यांमधील प्रमुख खरीप पिकांची आवक ऑक्टोबर २०२३ मध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वाढलेली दिसून आली. मका (५९ टक्के), मूग (११ टक्के), सोयाबीन (३७ टक्के) व कापूस (१०३ टक्के) यांची आवक वाढली. कांदा व टोमॅटोची आवक अनुक्रमे ६ व ३२ टक्क्यांनी वाढली.

Cotton Soybean
Cotton Market : धीर धरी रे...

३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे राहिलेः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात २.१ टक्क्यांनी घसरून रु. ५७,२४० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ५९,२८० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,४६७ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. १,५३०, एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८३ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

Cotton Soybean
Maize Sowing : रब्बीत शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,१२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. २,१७५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (डिसेंबर डिलिवरी) किमती रु. २,१९५ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमती रु. २,२२२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,४२८ वर होत्या. या सप्ताहात त्या रु. १३,४२८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १३,८४६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १५,८१८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १५.३ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात २.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० जाहीर झाला आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,६५० आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,०२५ वर आली होती. या सप्ताहात ती ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ५,०५० वर आली. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) २.६ टक्क्यानी वाढून रु. ११,१४४ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत आहेत.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com