Drought Impact on Soybean: दुष्काळामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असताना फूलसावंगी बाजारपेठेत सोयाबीनने प्रति क्विंटल ६ हजार ७१० रुपयांचा टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारचा यंदाच्या (२०२६-२७) हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ७०८ रुपये असताना बाजारात त्यापेक्षा १ हजार २ रुपये अधिक दर मिळत आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे..महागाव तालुक्यात यंदा पावसाच्या कमतरतेचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. प्रतिकूल हवामान आणि पाण्याअभावी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत फूलसावंगी येथील प्रमुख धान्य बाजारपेठेत सोयाबीनला मिळालेला चांगला दर महत्त्वाचा ठरत आहे. बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार ६०० ते ६ हजार ७१० रुपयांपर्यंत दर मिळत आहे..Soybean Productivity: सोयाबीनचा उतारा घटला.फूलसावंगी बाजारात दररोज सुमारे दोन हजार ते अडीच हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. व्यापाऱ्यांमधील स्पर्धा आणि सोयाबीनची मागणी यामुळे दराला आधार मिळत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील दर वाढल्याची माहिती परिसरात पसरल्याने महागाव तालुक्यासह आसपासच्या गावांतील शेतकरीही सोयाबीन विक्रीसाठी फूलसावंगी बाजारपेठेला पसंती देत आहेत..Soybean Farmers Compensation: बिकट परिस्थितीत हवा तिहेरी आधार.स्थानिक बाजारात सोयाबीन प्रक्रिया उद्योगांच्या खरेदीदरानुसार भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचत आहे. दूरच्या प्रक्रिया उद्योगांपर्यंत माल नेण्याऐवजी स्थानिक बाजारात विक्री करता येत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, दरातील वाढीचा फायदा घेताना उत्पादनातील घट ही शेतकऱ्यांसमोरील प्रमुख अडचण कायम आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षेपेक्षा कमी सोयाबीन आले आहे. त्यामुळे मिळणारा चांगला दर उत्पादनातील नुकसान कितपत भरून काढणार, हे प्रत्यक्ष उत्पादन आणि लागवड खर्चावर अवलंबून आहे..दुष्काळामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले आहे. मात्र, फूलसावंगी बाजारात मिळालेल्या विक्रमी दरामुळे किमान लागवड खर्च भरून निघून हातात चार पैसे उरण्याची आशा आहे. ऐन संकटात मिळालेला हा भाव आमच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा आहे.बाळू राठोड, शेतकरी, टाकळी.पावसाअभावी सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने आम्ही खचून गेलो होतो. मात्र, बाजारात मिळालेला दर अनपेक्षित असून मोठा दिलासा देणारा आहे. या भावामुळे दुष्काळी परिस्थितीत पुढील शेतीकामांसाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.अरविंद वैद्य, शेतकरी, फूलसावंगी.कमी आवक आणि वाढती मागणी यामुळे सोयाबीनच्या दरात झालेली वाढ अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. व्यापाऱ्यांमधील निकोप स्पर्धेतून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळणे स्वागतार्ह आहे. ही दरवाढ पुढेही टिकून राहावी, अशी अपेक्षा आहे. गुजाबराव उबाळे, व्यापारी, फुलसावंगी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.