Papaya Rate : नंदुरबारमध्ये पपईदराचा तिढा

एन मागणीच्या काळात पपईचे दर किलोमागे तीन रुपयांनी कमी केल्याने नंदुरबारातील पपई उत्पादक संतप्त झाले आहेत
Papaya Rate
Papaya Rate Agrowon

जळगाव ः एन मागणीच्या काळात पपईचे दर (Papaya Rate) किलोमागे तीन रुपयांनी कमी केल्याने नंदुरबारातील पपई उत्पादक (Papaya Farmer) संतप्त झाले आहेत. दर पूर्ववत किंवा २० ते २१ रुपये प्रतिकिलो जागेवर, असे द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरवाढ होईल तेव्हाच काढणी (Papaya Harvesting) करू, असा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Papaya Rate
Papaya Processong : पपईपासून टुटीफ्रुटी, मार्मालेड कशी बनवाल?

पपईची काढणी मागील आठवडाभरापासून नंदुरबारात बंद आहे. खानदेशात सर्वाधिक साडेपाच हजार हेक्टरवर पपईची लागवड नंदुरबारात झाली आहे. शहादा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरवर पपई आहे. याच भागात पपईची काढणी बंद आहे. पपईचे दर यंदा मागील दोन महिने टिकून आहेत.

Papaya Rate
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ला आरोग्यदायी का मानले जाते?

सुरवातीला जागेवर किंवा थेट खरेदीत प्रतिकिलो २१ ते २३ रुपये दर होता. दर नोव्हेंबरअखेर टिकून होते. डिसेंबरच्या सुरुवातीपासून दर खरेदीदारांनी हळूहळू कमी केले. त्यात किलोमागे पाच ते सहा रुपयांची घट मागील १२ ते १३ दिवसांत झाली आहे. यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.

पपईची काढणी बंद असल्याने खरेदीदार धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, जामनेर, मुक्ताईनगर भागांत पोचले आहेत. जळगाव, धुळे जिल्ह्यांत जागेवर २० रुपये प्रतिकिलोचा दर दिला जात आहे. पपईचे उत्पादन यंदाही कमी आहे. काही वाणांवर रोगाचा प्रादुर्भावही झाला आहे.

यामुळे उत्पादन कमी येत आहे. काही शेतकऱ्यांचे पपईचे पीक डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारीच्या मध्यातच काढून फेकावे लागेल. कारण पिकाची स्थिती खराब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढून नफाही हवा आहे. कारण पपईचे पीकही ११ ते १२ महिन्यांचे आहे.

बाजारात पपईचा तुटवडा

खरेदीसाठी दिल्ली, राजस्थान व इतर भागांतील खरेदीदार नंदुरबार, धुळे भागांत मागील दोन महिन्यांपासून थांबून आहेत. स्थानिक एजंटांची मदत घेऊन पपईची खरेदी केली जात आहे. परंतु दर कमी केल्याने शेतकऱ्यांनी काढणी बंद ठेवली आहे. यामुळे बाजारात पपईचा तुटवडा आहे.

‘‘नंदुरबार येथील स्थानिक प्रशासन, राज्य शासनाने खरेदीदार, बाजार समिती व शेतकरी, शेतकरी संघटनांची बैठक बोलावून तोडगा काढावा व दरवाढ करावी.
घनश्याम पाटील, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com