
Ahilyanagar News : कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला ७ ते १५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अलीकडच्या काळात शेवगाव तालुक्यात इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, मजुरी, मशागत या खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रासायनिक खते, तसेच औषध फवारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेला बाजारभाव अतिशय कमी आहे.
यामुळे कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे शहरटाकळी, दहिगावने, भावीनिमगाव येथील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगावने, शहरटाकळी, भावीनिमगाव, रांजणी, देवटाकळी, मजलेशहर, बक्तरपूर, मठाचीवाडी या परिसरांत जायकवाडी धरणाचे बॅक वॉटरचे पाणी मिळत असल्याने येथे साहजिकच बारामाही येणारे ऊस, केळी, आद्रक आदी पिके घेतली जातात.
परंतु, या पिकानंतर सर्वात जास्त कांदा पीक घेतले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरमधील लागवड केलेला कांदा मोठ्या प्रमाणात होता. त्याची काढणी फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली. कांद्याचे बाजारभाव हे उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाले. सर्वसाधारणपणे प्रतिकिलो १५ रुपये कांद्यास उत्पादन खर्च येत असतो.
मजुरी ६०० रुपयांवर
कांदा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता यावर्षी पाहायला मिळत आहे. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने एकरी ८५०० ते ९००० रुपयाला शेतकऱ्यांना कांदा काढण्याचा खर्च येत आहे.
सध्या ३०० रुपये असणारी मजुरी ६०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मजुरीबरोबरच प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने खर्चात वाढ झाली. कांदा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागत असल्याने कांदा उत्पादकांना मजूर मिळत नसल्याचा मोठा फटका बसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.