Agrowon Podcast : देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावातच

Market Update : आणखी काही दिवस कांदा बाजार याच भावपातळीच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Onion
Onion Agrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या बाजारात सुधारणा दिसून आली होती. सोयाबीनच्या वायद्यांनी सीबाॅटवर दीड महिन्यानंतर पुन्हा १२ डाॅलरचा टप्पा गाठला होता. त्यानंतर आज दिवसभर वायद्यांमध्ये चढ उतार होत राहीले. तर देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सचे भाव २० ते ५० रुपयांनी वाढले होते.

मात्र बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांवर कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील सुधारणा टिकून राहील्यास देशातील बाजारातही वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचा बाजार आजही स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ९५ ते ९६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान फिरत आहेत. तर काॅटलूक ए इंडेक्स सतत १०१ सेंटच्या वर दिसत आहेत. देशातील बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. कालच्या आवक ७५ हजार गाठींवर झाली होती.

तर सरासरी भावपातळी आज ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. तर कापसाला मागणी टिकून आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार सोडले तर बाजारात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Onion
Onion Market : पांढऱ्या कांद्याला बाजारात मागणी

देशातील बाजारात सध्या मक्याला चांगला आधार आहे. त्यामुळे मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत. परिणामी देशातून होणारी मका निर्यात मंदावली. देशात इथेनाॅल उद्योगाकडून मक्याला मागणी आहे. सरकारने उसापासून इथेनाॅल निर्मितीवर मर्यादा घातल्या.

तसेच धान्यही कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी इथेनाॅलसाठीची मागणी मक्याकडे वळली आहे. त्यामुळे भावपातळी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. मक्याचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Onion
Onion Rate : मुहूर्ताला कमाल ३०००, तर सरासरी १६०० रुपये दर

कांद्याच्या बाजारात रोज ५० ते १०० रुपयांचे चढ उतार होत आहेत. मात्र सरासरी दरपातळी काही आठवड्यांपासून १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दम्यान दिसत आहे. हा भाव उत्पादन खर्चाऐवढा आहे.

तर दुसरीकडे सरकार कांदा बाजारावरील आपली पकड राखून आहे. सरकारने देशातील कांदा उत्पादन जवळपास १६ टक्क्यांनी घटल्याचे सांगितले. पण निर्यातबंदी लावून भाव पाडले आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस कांदा बाजार याच भावपातळीच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील ज्वारी आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे. त्यामुळे ज्वारीच्या भावातील नरमाई कायम आहे. ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे.

सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने भावपातळी सरासरी एक हजार ते दीड हजार रुपयाने कमी झाली.  सध्या ज्वारीला ३ हजार ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com