Onion Rate : येवल्यात कांदा दर दीड रुपया किलो

अंदरसुल उपबाजार आवारावर कांद्याची एकुण आवक ५० हजार ८८ क्विंटल झाली.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Nashik Onion Rate : सप्ताहात येथील बाजार समितीच्या मुख्य व अंदरसुल उपबाजार आवारावर लाल कांदा आवकेत (Onion Arrival) वाढ झाली, तर बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन १५० ते २०० रुपये प्रति क्विंटल दराने (Onion Rate) कांदा विक्री झाला.

उत्पादन खर्चही भरुन निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसुन येत आहे.

सप्ताहात एकुण कांदा आवक ८२ हजार ४३४ क्विंटक झाली असुन, लाल कांद्याचे बाजारभाव किमान १५० रुपये ते कमाल ८५१ रुपये, तर सरासरी ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.

अंदरसुल उपबाजार आवारावर कांद्याची एकुण आवक ५० हजार ८८ क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान १५० रुपये ते कमाल ८५१ रुपये, तर सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.

Onion Rate
Onion Market : ‘नाफेड’ने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा

दरम्यान, गव्हाच्या आवकेत वाढ झाली. तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हाची एकुण आवक २५१ क्विंटल झाली असुन, बाजारभाव किमान २ हजार रुपये ते कमाल २ हजार ५०० रुपये, तर सरासरी २ हजार १५० रुपयांपर्यंत होते.

बाजरीच्या आवकेत घट झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. बाजरीची एकुण आवक १६ क्विंटल झाली असुन, बाजारभाव किमान २ हजार रुपये ते कमाल २ हजार ५०१ रुपये, तर सरासरी २ हजार १०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली.

बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरभऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. हरभऱ्याची एकुण आवक ८६ क्विंटल झाली. बाजारभाव किमान ४ हजार २० रुपये ते कमाल ६ हजार २७१ रुपये, तर सरासरी ४ हजार ६९० रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात तुरीच्या आवकेत घट झाली, तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. तूरीची एकुण आवक २० क्विंटल झाली. बाजारभाव किमान ६ हजार रुपये, कमाल ७ हजार २५१ रुपये, तर सरासरी ६ हजार ९०० रुपयेपर्यंत होते.

Onion Rate
Onion Rate: कांदा निर्यातीवर बंदी नाहीच; वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सुप्रिया सुळेंवर साधला निशाणा

सोयाबीनची आवक टिकून होती. बाजारभावही स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकुण आवक १४६ क्विंटल झाली.

बाजारभाव किमान ४ हजार ८०१ रुपये, कमाल ५ हजार २५० रुपये, तर सरासरी ५ हजार १०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर राहिले. मक्याची एकुण आवक २ हजार ४०२ क्विंटल झाली.

किमान २ हजार ७५ रुपये, कमाल २ हजार १७१ रुपये, तर सरासरी भाव प्रतिक्विंटल २ हजार १५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com