Turmeric Market : सांगली बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू

बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटलला किमान ५ हजार व कमाल १० हजार रुपये व सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळाला.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon

सांगली ः सांगली बाजार समितीत (Sangli Apmc market) मंगळवारी (ता. ३१) नवीन राजापुरी हळद सौद्यास (Turmeric Market) सुरुवात झाली. गणपती जिल्हा कृषी सोसायटीच्या दुकानातून सौद्यास सुरुवात झाली.

शेतकरी विनोद शिवाजी शेंडगे (पेड, ता. तासगाव) यांच्या राजापुरी हळदीला (Rajapuri Turmeric) क्विंटलला १० हजार १०० रुपये दर (Turmeric Rate) मिळाला. ही हळद मनाली ट्रेडिंग कंपनीने खरेदी केली.

बाजार समितीत हळदीला (Turmeric) प्रति क्विंटलला किमान ५ हजार व कमाल १० हजार रुपये व सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळाला.

सौद्यामध्ये ८६२ पोती (एक पोते ५० किलोचे) नवीन स्थानिक हळदीची आवक आणि व्रिकी झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरजचे तहसीलदार डी. एस. कुंभार, पोलिस निरीक्षक के. एम. पुजारी, बाजार समिती सचिव सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत सौद्यास प्रारंभ झाला.

या वेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अमर देसाई, सतीश पटेल, मनोहर सारडा, शीतल पाटील, गोपाळ मर्दा, सत्यनारायण अटल, मधुकर काबरा, अभय मगदूम, एन. बी. पाटील, सी. एम. शिंदे उपस्थित होते.

Turmeric Market
Turmeric Processing : सुधारित पद्धतीने हळद प्रक्रिया

बाजार समितीचे प्रशासक मंगेश सुरवसे, सचिव महेश चव्हाण यांनी, उत्पादकांनी आपली अधिकाधिक हळद विक्रीसाठी सांगली बाजार समितीत घेऊन यावे. शेतकऱ्यांसाठी सुरू असणाऱ्या शासनाच्या हळद, बेदाणा शेतीमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com