Market Bulletin:सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज काहीसा स्थिरावला होता. सोयाबीनला उठाव आहे. मात्र मागील आठवडाभरापासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार आले होते. पण आज चढ उतार थांबून भाव स्थिरावला आहे. आज सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बियाणे दर्जाचे सोयाबीन आजही ९ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव स्थिरावेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस आवक कमीचदेशातील बाजारात कापसाचा भाव स्थिरावला आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. तर कापसाला उठाव चांगला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव आज टिकून होता. कापसाचा भाव ८० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान स्थिरावला आहे. याचा आधार देशातील बाजारालाही मिळत आहे. देशात कापूस ८ हजार ३०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आज विकला गेला. कापसाला उठाव चांगला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशात कापसाच्या भावाला आधार मिळत आहे. त्यामुळे पुढील काळातही कापसाचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कांदा भावात काहीशी सुधारणा; सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार, कापसात नरमाई, लिंबू स्थिर तर आल्याचे भाव टिकून.कांदा आज टिकूनकांदा भाव कालपासून काहीसा स्थिरावला आहे. देशातील बाजारात कांद्याची सरासरी भावपातळी कालच्या पातळीदरम्यान दिसत होती. परंतु आजही काही बाजारांमध्ये सरासरी भाव ८०० रुपयांच्या दरम्यान होता. तर किमान भाव काही ठिकाणी २०० रुपयांच्या दरम्यान दिसून आला. काही बाजारांमध्ये कांद्याचा किमान आणि सरासरी भाव आजही कमीच होता. पण बहुतांशी बाजारांमध्ये किमान भाव आता ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. तर सरासरी भाव ११०० ते १३०० रुपयांच्या दरम्यान आला आहे. बाजारातील स्थिती पाहता कांदा भावाला आधार राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमीच; सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार, कापूस काहीसा नरमला, टोमॅटो भावात सुधारणा तर शेवगा स्थिरावला.टोमॅटो भावात सुधारणाराज्यातील बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे वाढले आहेत. मागील काही आठवड्यांपासून बाजारातील आवक कमी होत आहे. राज्यभरातच नाही तर देशभरातील टोमॅटो पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला. पाणीटंचाईमुळे अनेक भागात तोटा कमी झाला आहे. याचा परिणाम बाजारावर जाणवत आहे. सध्या बाजारात टोमॅटो सरासरी २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पुढील काही काळ पाणीटंचाई आणि उष्णता तसेच त्यानंतर पावसाचा टोमॅटो पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. टोमॅटोची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. याचा दराला आधार मिळेल, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .तुरीची आवक कमीचदेशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपास पोचला आहे. पण दरपातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसत आहे. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसत आहे. तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसत आहे. सध्या तूर बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभुमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.