तूर, उडीद आणखी भाव खाणार का?

सध्या देशात तूर आणि उडीद डाळींची मागणी वाढलीय. मात्र पुरवठा कमी आहे. त्यातच खरीप कडधान्यांची (Pulses Cultivation) लागवड पिछाडीवर पडली आहे. त्यामुळे तूर आणि उडीद डाळींच्या दरात १५ टक्के वाढ झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
Market Rate
Market RateAgrowon

पुणेः देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तूर आणि उडदाची डाळ महाग झाली आहे. या डाळींचे दर जवळपास १५ टक्क्यांनी वाढलेत. तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांचा जीव यामुळे भांड्यात पडेल का? शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारात येईल तेव्हा भाववाढीचा कल कायम राहील का ही खरी यातली ग्यानबाची मेख आहे.

सध्या देशात तूर आणि उडीद डाळींची मागणी वाढलीय. मात्र पुरवठा कमी आहे. त्यातच खरीप कडधान्यांची (Pulses Cultivation) लागवड पिछाडीवर पडली आहे. त्यामुळे तूर आणि उडीद डाळींच्या दरात १५ टक्के वाढ झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर आणि उडदाची लागवड कमी आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात तुरीची लागवड १०.४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे, तर उडदाचा पेराही ६ टक्क्यांनी घटला. तूर आणि उडदाचे पीक घेतल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय. पिकांमध्ये पाणी साचल्यानं नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन माल बाजारात येण्यास आणखी खूप वेळ आहे. दुसरीकडे सणांमुळे तूर आणि उडदाच्या डाळीची मागणी वाढलीय. त्याचा परिणाम दरांवर झालाय.

मागील सहा आठवड्यांमध्येच तूर आणि उडीद डाळीचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. लातूर येथे चांगल्या दर्जाच्या तुरीला प्रतिकिलो ११५ रुपयांचा दर मिळतोय. सहा आठवड्यांआधी दर ९७ रुपयांच्या आसपास होते.

देशात सध्या तुरीचा मोठा साठा शिल्लक नाही. मागील वर्षी तुरीला कमी दर मिळाले. त्यामुळे यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनकडे (Soybean) वळले. त्यामुळे तुरीचा पेराही कमी झाला. सध्या तुरीचे दर तेजीत असले तरी लगेच आयात वाढेल अशी स्थिती नाही.

आफ्रिकेतून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ५ लाख टन तूर आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या मागणी-पुरवठ्याचं समीकरण जुळेल. पण देशातील नवीन तूर डिसेंबरमध्ये बाजारात यायला सुरुवात होईल. त्यामुळे दरात आणखी मोठी तेजी येण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांनी सांगितलं.

Market Rate
Sugarcane: उत्तर प्रदेश सरकार राबवणार 'पंचामृत योजना'

पावसामुळं उडीद पिकासाचंही नुकसान होतंय. परंतु म्यानमारमधून उडदाची आयात सुरु आहे. दर वाढल्यास आयात वाढण्याची शक्यता आहे. मात्र देशातील उत्पादन कमी राहिलं आणि दर वाढले तर निर्यातदार देशही दर वाढवतील. या परिस्थितीत देशातही उडदाचे दर चांगले राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

देशात तूर आणि उडदाचा पेरा घटलाय. पावसामुळे पिकांचं नुकसानही होतंय. देशात नवीन माल येण्यास आणखी उशीर आहे. सणांमुळं मागणी वाढली, मात्र पुरवठा कमी आहे. आपल्याकडं भाव वाढले की निर्यातदार देशही भाव वाढवतात. सध्या आयात मालही महाग पडतोय. त्यामुळं देशात तूर आणि उडीद डाळींचे दर वाढलेत.

- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दाल मिल्स ओनर्स असोसिएशन

आफ्रिकेतून साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात तूर आयात होईल. मात्र देशात पेरा कमी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या तूर उत्पादक राज्यांमध्ये पावसामुळे पिकाला फटका बसतोय. श्रावण महिना आणि सणांमुळे मागणी वाढलीय. त्यामुळे दर सुधारले आहेत.

- सुरेश अगरवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया दाल मिल्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com