Chana Rate
Chana RateAgrowon

Agrowon Podcast : हरभरा निर्यातवाढीचा बाजाराला आधार मिळेल?

यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत असले तरी सरकारने मात्र विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय. देशात यंदा १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे.

१) सोयाबीनमधील नरमाई कायम (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) आजही काहीशी नरमाई दिसली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४३६ डाॅलरपर्यंत कमी झाले. सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांवर ब्राझीलच्या सोयाबनचा परिणाम होत आहे.

देशातही सोयाबीन दर आज स्थिर होते. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळतोय. सोयाबीनचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

२) कापूस बाजार स्थिरावला (Cotton Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांवरील दबाव कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८०.१५ सेंट प्रतिपाऊंंडवर होते. तर देशात कापसाचे दर स्थिर आहेत. देशातील बाजारात कापसाची आवक आजही अधिक होती.

बाजारातील आवक सरासरीपेक्षा अधिक असल्याने दरावर दबाव आहे. सध्य कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरावरील दबावही दूर होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

३) हळदीचे दर टिकून (turmeric Rate)

बाजारातील हळदीची आवक हळूहळू वाढत आहे. मात्र हळदीला मागणी चांगली असल्याने दरही चांगला मिळत आहे. हळदीला निर्यातीसाठी मागणीही होती. त्यातच यंदा हळद पिकाला काही भागात पावसाचा फटकाही बसला.

सध्या हळदीला सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात हळदीच्या आवकेचा दबाव वाढेल. त्यामुळंं दरात काहीशी नरमाई येऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

Chana Rate
Turmeric Cultivation : सांगली जिल्ह्यात हळद लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता

४) लिंबाचे दर तेजीत (lemon rate)

उन्हाचा चटका वाढला तसे लिंबाला मागणी वाढलीय. उन्हाळ्यात लिंबाला विशेष मागणी असते. पण दुसरीकडं उत्पादन कमी असतं. यंदाही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे.

सध्या लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर बाजारातील आवक कमी आहे. पुढील दोन महिने लिंबाच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? (Chana Rate)

यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत असले तरी सरकारने मात्र विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय. देशात यंदा १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे. पण यंदा हरभरा उत्पादकता ३० टक्क्यांपर्यंत कमी राहिल्याचे शेतकरी सांगत आहेत.

इतर कडधान्याचे भाव तेजीत असल्याने सरकार हरभरा खेरदी करत आहे. आतापर्यंत नाफेडने १३ लाख २२ हजार टन हरभरा खरेदी केला. त्यापैकी ५ लाख ३७ हजार टन महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात ३ लाख ४४ हजार टन आणि गुजरातमध्ये २ लाख ४३ हजार टनांची खरेदी झाली.

Chana Rate
Maize, Chana Market Update : मक्याच्या दरात घट; हरभरा स्थिर

सरकारच्या खरेदीनंतरही खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव दबावात आहेत. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय. बाजारात हरभरा दर दबावात असल्याने निर्यातही वाढलीय. मागील आर्थिक वर्षात देशातून १ लाख २७ हजार टनांची निर्यात झाली.

तर २०२१-२२ मधील निर्यात ४३ हजार टनांवर होती. सध्या बाजाराचे लक्ष नाफेडच्या खरेदीकडे आहे. नाफेडने मागील वर्षीप्रमाणं खरेदी केल्यास खुल्या बाजारालाही आधार मिळेल. दर हमीभावाचाही टप्पा गाठू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com