Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजार वाढूनही देशात सोयाबीन दबावात का?

Soybean Market : अमेरिकेतील कमी पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली. अमेरिकेतील काही भागात सध्या दुष्काळी स्थिती दिसत आहे.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on: 
Updated on: 

१) कापूस भावातील नरमाई कायम (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाचे भाव आज स्थिर होते. कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली.

दुपारी ३ वाजेपर्यंत एमसीएक्सवर कापसाचे वायदे ५६ हजार ५८० रुपयांवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे दबावात आहेत. कापूस दरावर आणखी काही दिवस दबाव दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) उडदाच्या दरात वाढ सुरुच (Urad Rate)

देशातील बाजारात उडदाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने स्टाॅक लिमिट लावले. पण सरकारच्या स्टाॅक लिमिटनंतर म्यानमारने निर्यातीचे भाव वाढवले. त्यामुळे उडदाच्या भावात सुधारणा झाली.

सध्या उडदाचे भाव ८ हजार ते ९ हजार २०० रुपयांवर पोचले. देशातही उडदाचा तुटवडा आहे. निर्यातदार देश भारतातील उत्पादन वाढल्याशिवाय भाव कमी करण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उडीद दरातील तेजी कायम राहू शकते,असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

३) हरभरा बाजार दबावातच (Chana Market)

नाफेडने देशभरात जवळपास २३ लाख ३० हजार टन हरभरा खेरदी केला. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक ७ लाख ९७ हजार टन आणि महाराष्ट्रात ७ लाख ७३ हजार टनांची खरेदी केली. गेल्यावर्षीच्या खेरदीशी तुलना केल्यास यंदा महाराष्ट्रातील खरेदी काहीशी वाढली तर मध्य प्रदेशात घटली.

खुल्या बाजारात मात्र हरभऱ्यावरील दबाव कायम असून आजही हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. हरभरा बाजारावरील दबाव पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Soybean Market
Chana Procurement : हमीभावाने २ लाख ७० हजार क्विंटलवर हरभरा खरेदी

४) टोमॅटो दरात सुधारणा (tomato Rate)

बाजारातील आवक घटल्यानंतर टोमॅटो दरात सुधारणा झाली. अगदी दोन आठवड्यापर्यंत अनेक भागात टोमॅटोचे भाव पडलेले होते. शेतकऱ्यांना तोडणीलाही टोमॅटो परवडत नव्हता. पण आता बहुतेक बाजारात दराने २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.

पुढील काळात टोमॅटो आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातील सुधारणा वाढू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? (Soybean Rate)

अमेरिकेतील कमी पावसामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात सुधारणा झाली. अमेरिकेतील काही भागात सध्या दुष्काळी स्थिती दिसत आहे. याचा सोयाबीन पिकावर परिणाम होत आहे. यामुळे सीबाॅटवरील सोयाबीन आण सोयापेंडच्या दरातील सुधारणा कायम आहे. आजही सोयाबीनचे भाव वाढले होते.

दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.९० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. कालच्या तुलनेत आज १० सेंटची सुधारणा झाली. सोयापेंडचे भावही ४२७ डाॅलरवर पोचले होते. आज सोयापेंडचे वायदे ४१७ डाॅलरवर सुरु झाले होते. म्हणजेच दुपारपर्यंत दरात १० डाॅलरची सुधारणा झाली होती.

Soybean Market
Soybean Sowing : नगर जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

देशातील बाजारात मात्र सोयाबीन भाव दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. सोयाबीनचे भाव आजही ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपयांवर कायम होते. सोयाबीनची आवक आज १ लाख ८० हजार क्विंटलची आवक झाली होती.

जून महिन्यातील आक काहीशी अधिक आहे. त्यामुळे बाजारावर दबाव आहे. तसेच खाद्यतेलाचे भाव देशात दबावात आहेत. याचाही परिणाम सोयाबीन बाजारावर जाणवत आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दरातील सुधारणा कायम राहील्यास देशातील बाजारातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.