Agrowon Podcast : तुरीच्या दरातील तेजी देशभरातील बाजारात टिकून

Tur Market: देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या देशात तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नानंतरही भाव कमी होण्याचं नाव घेईना.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on: 
Updated on: 

१) सोयाबीन दरात नरमाई (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे आज दुपारपर्यंत नरमले होते. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने नफावसुली होऊ शकते, असे अभ्यासकांनी सांगितले. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव आजही स्थिर होते.

सोयाबीनला आज प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपये भाव मिळाला. बाजारातील आकही कायम होती. सोयाबीनचा बाजार आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीवर अवलंबून असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.

२) कापूस वायदे घटले (Cotton Rate)

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये आज घट पाहायला मिळाली. कापूस वायदे दुपारपर्यंत आज सीबाॅटवर ७९.४२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशात एमसीएक्सवरील वायदे ३६० रुपयांनी कमी होऊन ५५ हजार ६०० रुपयांपर्यंत कमी झाले. हा भाव हंगामातील निचांकी होता.

बाजार समित्यांमध्येही कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये भाव मिळाला. कापसाच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कोथिंबिरचे भाव तेजीत (Coriander Rate)

बाजारात सध्या कोथिंबीरच्या दरात मोठी तेजी आली. बाजारातील आवक कमी झाल्यानेच दराला आधार मिळाला. जूनमध्ये पावसाने दडी दिली, तसेच वाढत्या उष्णतेमुळे पिकावर परिणाम झाली. त्यामुळे आवक घटली.

सध्या कोथिंबीरला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ७०० रुपये प्रितिक्विंटलचा भाव मिळत आहे. तर शेकड्याचे भाव एक हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील महिनाभर कोथिंबरचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tur Market
Mustard Production : बदलत्या हवामानामुळे मोहरी उत्पादनात घट, बाजारात एमएसपीपेक्षा कमी भाव

४) मोहरी दरात काहीशी वाढ (Mustard Rate)

देशात यंदा मोहरीचे उत्पादन वाढले. त्यातच देशात खाद्यतेलाची मोठी आयात झाली. रशिया आणि युक्रेनमधून मोहरी तेल भारतात आले. खाद्यतेलाचा बाजारात दबावात आल्यानंतर मोहरीचे दरही कमी झाले. हंगामाच्या सुरुवातीपासूनच मोहरी हमीभावापेक्षा कमी दरात विकली जात आहे.

मागील काही दिवसांमध्ये दरात काहीशी वाढ झाली. पण अद्यापही हमीभावाचा टप्पा पार केला नाही. मोहरीला सध्या ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. मोहहीचे हे भाव पुढील काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? (Tur Rate)

देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या देशात तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नानंतरही भाव कमी होण्याचं नाव घेईना. सरकारने तुरीची साठेबाजी होऊ नये यासाठी स्टाॅक लिमिट लावले, स्टाॅकवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमली, नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे आदेश राज्यांना दिले.

पण तरीही बाजारातील तूर आवक वाढली नाही. नफावसुलीसाठी काही बाजारांमध्ये आवक वाढते, पण ही आवक टिकून राहत नाही. यंदा एल निनोचे वर्ष असल्याने कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी तूर लागवड वाढवावी यासाठी हमीभावाने खेरदीच्या नियमात बदल केले.

Tur Market
Tur Market : विदर्भात तुरीचे दर १० हजारांवर स्थिरावले

हमीभावातही वाढ केली. पण अद्याप लागवडीयोग्य पाऊसच झाला नाही. तसेच तूर सहा ते सात महिन्याचे पीक असल्याने माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पाऊस कसा राहतो, यावर उत्पादन अवलंबून राहील. आतापर्यंत देशातील तूर लागवड गेल्यावर्षीपेक्षा ६५ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या हंगामात २३ जूनपर्यंत जवळपास २ लाख हेक्टरवर लागवड झाली होती.

तर यंदा केवळ ६२ हजार हेक्टवर पोचली. पाऊस आणखी लांबल्यास तूर लागवडीवर परिणाम होऊ शकतो. पण याबाबत लगेच सांगता येणार नाही. पण तुरीच्या दरातील तेजी खरिपातील लागवड आणि पावसावर अवलंबून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com