Cotton Market : कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत

कापूस दराने आज मागील दोन महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला होता. आज कापसाचे वायदे ८७.४७ सेंटवर बंद झाले. तर देशातील बाजारात मात्र कापूस दर आजही स्थिर होते.
 Cotton Market
Cotton MarketAgrowon


केंद्र सकारने सात शेतीमालावरील वायदेबंदी (Vayadebandi) एक वर्षासाठी वाढवली. याचा शेतकऱ्यांना फटका बसणारच आहे. मात्र आता प्रक्रिया दारांच्या संघटनेनेही वायदेबंदीला विरोध केला आहे. पण वायदेबंदीला विरोध करणारी ही संघटना कोणती? या संघटनेची नेमकी मागणी काय? शेतकऱ्यांना वायदे सुरु झाल्याचा काय फायदा होऊ शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

 Cotton Market
Cotton Market: कापसाचा पेरा वाढला, पण उत्पादन वाढणार का? |ॲग्रोवन

1. कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत

तर राष्ट्रीय बाजारात मागील चार दिवसांमध्ये कापूस दरात तेजी आहे. कापूस दराने आज मागील दोन महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला होता. आज कापसाचे वायदे ८७.४७ सेंटवर बंद झाले. तर देशातील बाजारात मात्र कापूस दर आजही स्थिर होते. आज कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. सध्या कापूस बाजाराचे लक्ष चीन आणि इतर देशांमध्ये वाढणाऱ्या कोरोनाकडे आहे. मात्र देशातील कापूस बाजारावर याचा लगेच परिणाम होणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकरी टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री सुरु ठेवावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

 Cotton Market
Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर तेजीत

2. उडदाचे दर तेजीतच

सध्या बाजारात उडदाला चांगली मागणी आहे. मात्र देशातील खरिपातील उत्पादन कमी राहिलं. म्यानमारमधून सध्या उडदाची आयात सुरु आहे. मात्र प्रक्रिया उद्योगाकडून त्याची लगेच उचल केली जातेय. देशात महिन्याला सरासरी अडीच लाख टन उडदाचा वापर होतो. तर सध्या बाजारात दोन लाख टनांपर्यंत खेरदी केली जात आहे. उडदाचे दरही ६ हजार ३०० ते ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. उडदाचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
 

3. आल्याचे दर सध्या टिकून

बाजारात सध्या आल्याची आवक काहीशी कमी आहे. त्यामुळं आल्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली. यंदा आले उत्पादक काही भागांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसला होता. त्यामुळं बाजारातील आल्याची आवक सध्या कमी दिसते. सध्या आल्याला प्रतिक्विंटल ६ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. आल्याचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

4. हिरव्या मिरचीची आवक वाढली

देशातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते. मात्र हिरव्या मिरचीला मागणीही टिकून आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार २०० ते ३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हिरव्या मिरचीचा हा दर पुढील काही दिवस तरी टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 

5. सरकारच्या निर्देशावरून सेक्यूरीटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आर्थात सेबीने सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, गहू, तांदूळ, हरभरा, कच्चे पामतेल आणि मुगाच्या वायद्यांवर बंदी घातली. वादेबंदीचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. शेतकऱ्यांना पुढील काळात आपल्या शेतीमालाचे दर काय राहू शकतात? याची माहिती वायद्यांमधून मिळते. मात्र आता दराच्या माहितीसाठी शेतकऱ्यांना स्थिनिक बाजारावरच अवलंबून राहावे लागेल. छोटे व्यापारी, प्रक्रियादार आणि आयातदार यांनाही वायदेबाजाराचा फायदा होत असतो. साल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने सेबीला पत्र लिहून किमान पामतेल आणि सोयातेलाचे वायदे सरु करण्याची मागणी केली. वायद्यांमुळे शेतीमालाच्या बाजारात कोणतीही अवास्तव वाढ होत नाही, असे अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झाल्याचंही एसईएचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी म्हटलंय. देशातील छोटे तेल प्रक्रियादार कच्च्या तेलाची आयात करून प्रक्रिया करत असतात. मात्र खाद्यतेल बाजारात सध्या मोठे चढ उतार सुरु आहेत. वायद्यांमधून आयातदार आणि प्रक्रियादारांना जोखीम कमी करता येते. त्यामुळं सरकराने किमान खाद्यतेलाच्या वायद्यांवरील बंदी उठवावी, अशी मागणी झुनझुनवाला यांनी केली. तसेच सोयाबीनचे वायदे सुरु झाल्यास व्यापारी, उद्योग आणि गुंतवणुकदारांना प्रोत्साहन मिळेल. सध्या सोयाबीन सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. मात्र सोयाबीन दर किमान २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com