Wheat Market : सरकारने गहू लिलावासाठी आरक्षित किंमत घटवली

देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. मात्र तरीही गव्हाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने गहू लिलावाची आरक्षित किंमत कमी केली.
Wheat Market
Wheat MarketAgrowon

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत

देशातील सोयाबीन बाजारभाव (Soybean Market rate) आज स्थिर होते. सोयाबीनची दरपातळी सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे (Soybean Vyade) शुक्रवारी १५.४३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंडने ५०० डाॅलरचा टप्पा गाठला होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दर तेजीत आहेत.

भारतातूनही सोयापेंड (Soyameal) निर्यात गतीने सुरु आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. कापसाचे भाव स्थिर

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. सध्या कापसाला देशात सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये दर मिळतोय.

युएसडीएनं भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला. तर देशातील उद्योगांनीही उत्पादन घटीला दुजोरा दिला. तसंच देशातून कापूस निर्यातही सुरु झाली.

उद्योगही फायद्यात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं कापसाचे भाव सुधारण्यास पोषक स्थिती आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Wheat Market
Cotton Market: कापसाचे भाव आणखी कमी होतील का? | Agrowon

3. तुरीचे बाजारभाव कायम

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील आवक हळूहळू वाढत आहे.

यंदा देशातील तूर उत्पादन घटले. तसेच उठाव चांगला आहे. त्यामुळे सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये दर मिळतोय.

पुढील काळता बाजारावर आकेचा दबाव येईल. यंदा तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं तुरीची विक्री करावी, असं आवाहन कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी केलंय. 

4. पपईला चांगला उठाव

बाजारात सध्या पपईची आवक कमी आहे. मात्र दिवसा वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे पपईला चांगला उठाव मिळत आहे.

सध्या राज्यातील पुणे, मुंबई, जळगाव आणि नाशिक बाजारातच काहीशी अधिक आवक दिसते. मात्र इतर बाजारांमधील दैनंदीन आवक १० क्विंटलपेक्षाही कमी आहे.

त्यामुळे सध्या पपईला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज फळबाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

5. देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली.

मात्र तरीही गव्हाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने गहू लिलावाची आरक्षित किंमत कमी केली.

मग सरकारने गव्हाची किंमत किती कमी केली? गव्हाचे दर कमी करण्यासाठी आणखी कोणते निर्णय घेतले? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

देशातील बाजारात गव्हाचे दर तेजीत आहेत. दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २ हजार ३५० रुपये मूळ किंमत ठेवण्यात आली होती.

मात्र लिलावात यापेक्षा जास्त दर मिळाला. भारतीय अन्न महामंडळानं पहिल्या टप्प्यात ९ लाख २६ हजार टन गव्हाची विक्री केली.

पण बाजारातील गव्हाचे दर सरकारच्या अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

गव्हाचे ह दर आणखी कमी करण्यासाठी सरकारने गव्हाची आरक्षित किंमत क्विंटलमागं ५० रुपयाने कमी करून २ हजार ३०० रुपये केले. महामंडळाच्या गोदामांमधून गहू नेण्यासाठी वाहतुक खर्च करावा लागत होता. त्यामुळं गव्हाचे दर जास्त राहीले.

हे लक्षात आल्यानंतर महामंडळाने गहू वाहतुकीचा खर्च स्वतः करण्याचं ठरवलं आहे. तसचं सरकारी संस्था आणि एनजीओंना २१५० रुपयाने गहू दिला जाणार आहे. रब्बी हंगामातील गहू पुढील काही दिवसांमध्ये बाजारात येईल.

त्याआधी बाजारातील भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पण सध्या गव्हाचे भाव तेजीतच आहेत.

तसंच लिलावात आरक्षित किमतीपेक्षा जास्त दर मिळतो. त्यामुलं गव्हाचे दर सध्यातरी २७०० रुपयांपेक्षा जास्त कमी होण्याची शक्यता दिसत नाही, असा अंदाज गहू बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com