Agrowon Podcast : सणांमुळे हळदीला मागणी वाढली

Market Bulletin : देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हळदीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील कमी झालेला पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे भावात तेजी होती. पण पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झाला होता. तर नफावसुलीसाठी विक्रीही वाढली होती.
Market Bulletin
Market BulletinAgrowon
Published on
Updated on

1. सलग दोन तीन दिवस वाढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहिसे चढ उतार सुरु होते. सोयाबीनचे वायदे १३.१३ डाॅलरवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४१३ डाॅलरवर होते. देशातील बाजारात आज भावपातळी ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांवर कायम होती. सोयाबीनच्या भावातील चढ उतार आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

   
2. कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. तर देशातील वायदे ५८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र स्थिर आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापतील ओलावा कमी झाल्यानंतर कापसाचे भाव स्थिरावू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरातील तेजी कायम

3. देशातील बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचा विचार करता डाळिंबावर मोठ्या प्रमाणात तेलकट डाग रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे गुणवत्तापूर्ण माल कमी आहे. सध्या गुणवत्तापूर्ण मालाला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. तर सरासरी भावपातळी ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. डाळिंबाचे हे भाव टिकून राहू शकतात, अशा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

4. देशातील बाजारात तुरीचे भाव टिकून आहेत. आफ्रिकेतून आयात सुरु झाल्यानंतर तुरीच्या दरातील तेजी स्थिरावली आहे. पण यंदा लागवड झालेल्या तुरीलाही कमी पाऊस आणि किड रोगांचा फटका बसत आहे. त्यातच लागवडही कमी आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील तूर पिकाची स्थिती पाहता तुरीचे भाव पुढील काळातही तेजीत राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरातील तेजी कायम

5. देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हळदीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील कमी झालेला पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे भावात तेजी होती. पण पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झाला होता. तर नफावसुलीसाठी विक्रीही वाढली होती. आता सणांचा काळा तोंडावर आहे. त्यातच वाढलेल्या भावात खरेदी केलेल्या हळदीचा स्टाॅक देशात आहे. भाव वाढल्याने गरजेप्रमाणे हळदीची खरेदी विक्री सुरु आहे. याचा दबाव हळदीच्या भावावर कायम आहे. वाढलेल्या भावात हळदीची निर्यातही कमीच आहे. विदेशातून वाढलेल्या भावात मागणी येत नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. या सर्व कारणांनी हळदीच्या दरात काहिशी नरमाई आली. सध्या बाजारात हळदीला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे.

चालू आठवड्यात दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची नरमाई दिसून आली. तर वायद्यांमध्येही भाव काहीसे कमी झाले. वायदे १४ हजारांच्या दरम्यान आहेत. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर हळदीचे व्यवहार १३ हजार ५०० रुपयाने झाले. या भावातही घट झाल्याचे दिसून आले. पण भाव नरमल्यानेही बाजारातील आवक कमी झाली. शेतकरी किंवा स्टाॅकिस्ट भाववाढीच्या अपेक्षेने माल बाहेर काढताना दिसत नाही. बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा ३० टक्केही आवक नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. मागील हंगामातील हळदीचा स्टाॅक सध्या देशात कमी आहे. तर यंदा लागवड कमी झाली. त्यातच हळद पिकाला पावसातील खंड आणि वाढलेल्या उष्णतेचा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे हळदीच्या दराला पुढील काळातही चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com