अमेरिकेत सोयाबीनचे उत्पादन वाढीचा अंदाज

अमेरिकेत वसंत ऋतुत सोयाबीनचे उत्पादन क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

1. तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात उन्हाचा तडाखा बसलाय. अकोला येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच नगर आणि बुलडाणा येथे उष्ण लाट होती. उद्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

Soybean
Chana BajarBhav : हरभरा उत्पादकांसाठी ही आहे खुशखबर

2. देशात यंदा मोरहीची लागवड वाढली होती. त्यामुळे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचणार हे नक्की. सध्या मोहरीची काढणी सुरुये. सध्या बाजारातही आवक वाढतेय. मात्र सोयाबीनप्रमाणेच मोरही उत्पादकही एकदम माल विकण्यास उत्सुक नाहीत. प्रमुख मोहरी उत्पादक राज्यांतील मोठे शेतकरी मोहरीचा साठा करण्यास प्राधान्य देत आहेत. मागील हंगामात मोहरीच्या दराने विक्रमी ८ हजार ८१३ रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी लगेच माल विकण्यास तयार नाहीत. पामतेल आणि सूर्यफूलतेलाची कमी आवक होत आहे. त्यामुळे यंदा मोहरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

3. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनने गहू निर्यातबंद केली. युद्ध सुरु झाल्यानंतर युक्रेनने मार्च महिन्यात गहू, मका आणि सूर्यफूल तेल निर्यात थांबविली. मात्र त्यानंतर दोनच आठवड्यांत मका आणि सूर्यफूल तेलावरील निर्यातबंदी उठविली. मात्र गव्हावर अद्यापही निर्यातबंदी कायम आहे. मात्र येथील व्यापाऱ्या संस्थांनी आता गहू निर्यातीसाठी परवानगीची मागणी केली. देशात गव्हाचा पर्याप्त साठा उपलब्ध असल्याचे या संस्थांनी सरकारला सांगितले. त्यामुळे निर्यातीला परवानगी दिली तरी देशातील खाद्यसुरक्षेला धोका पोचणार नाही, असेही निर्यातदारांनी म्हटले आहे.

4. सरकारने मागील वर्षापासून कडधान्य आयातीचा सपाटा लावला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात होऊन देशातील दर दबावात आहेत. तूर, मूग आणि उडदाची आयात यंदा विक्रमी पातळीवर झाली. मात्र हरभरा आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच राहिली. जाणकारांच्या मते एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात काबुली हरभऱ्याची आयात ५७ टक्क्यांनी घटली. गेल्यावर्षी १ लाख ४१ हजार टन काबुली हरभऱ्याची आयात झाली होती. ती यंदा ६० हजार टन स्थिरावली. तर देशी हरभरा आयात २ टक्क्यांनी घटून १ लाख ३३ हजार टनांवर पोचली. मागील हंगामात १ लाख ३४ हजार टन देशी हरभरा देशात आला होता, असे जाणकारांनी सांगितले.

Soybean
हिरव्या मिरचीची पुणे मार्केटमध्ये मोठी उलाढाल

5. सध्या जागतिक बाजारात सोयाबीन आणि मक्याचे दर तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन मागणीचा लाभ अमेरिकेला मिळतोय. ब्राझील आणि अर्जेंटीनात उत्पादन घटले. त्यामुळे चीनसह महत्वाच्या आयातदार देशांनी अमेरिकेकडे सोयाबीनची मागणी केली. निर्यात जास्त झाल्याने सध्या अमेरिकेतील सोयाबीन साठा कमी झाला. परिणामी दर तेजीत आहेत. तसेच मक्याच्या दरानेही उच्चांक गाठला. आता अमेरिकेत वसंत ऋतुतील पेरणी होईल. यात सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाजये. तर मक्याचे उत्पादन क्षेत्र घटेल, अशी शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने व्यक्त केली. युएसडीएने अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ३७ लाख ६० हजार एकरने वाढण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी ८७१ लाख एकरवरील सोयाबीन हाती आले होते. तर यंदा सोयाबीन उत्पादन क्षेत्र ९१० लाख एकरवर राहण्याचा अंदाज आहे. मात्र मक्याचे क्षेत्र ३८ लाख ७० हजार एकरने कमी राहण्याचा अंदाजये. गेल्या हंगामात ९३३ लाख एकरवरील मका पिकाची काढणी झाली होती. मात्र यंदा ८९५ एकरवरील मका काढणी होऊ शकते, असं युएसडीएनं म्हटलंय. मात्र प्रत्यक्ष पेरणी सुरु झाल्यानंतर या क्षेत्रांत बदल होऊ शकतो. अमेरिकेत मक्याची लागवड लवकर सुरु होऊन लवकर संपते. तर सोयाबीनची लागवड उशीरा सुरु होऊन उशीरापर्यंत चालते. मात्र जाणकारांच्या मते यंदा मक्याची लागवड वाढू शकते. वसंत ऋतुत तापमान उष्ण राहिल्यास मक्याची लागवड वाढू शकते. तर तापमान थंड राहिल्यास सोयाबीनची लागवड वाढू शकते, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com