Chana Market
Chana Market Agrowon

Agrowon Podcast : नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार

खुल्या बाजारातील हरभरा दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून येत आहे. नाफेडने देशात कालपर्यंत ७ हजार ६३३ टन हरभरा खरेदी केली.

१) सोयाबीनमध्ये चढ उतार सुरुच (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन आणि सोयापेंड दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे १४.९१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४८० डाॅलरवर होते.

तसेच देशातील दरपातळी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये होती. बाजारातील आवक वाढल्याने दरावर दबाव असल्याचे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

२) कापूस दरात नरमाई कायम (Cotton Rate)

कापूस बाजारात सध्या स्थैर्य दिसत नाही. कापसाच्या दरात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर आज काहीसे दबावात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७९ सेंट प्रतिपाउंडवर होते.

तर देशात कापसाला सध्या ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपये भाव मिळतोय. मार्च महिन्यात कापसाचीही आवक वाढली आहे. त्यामुळे दर दबावात आहेत, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

३) तुरीच्या दरात तेजी (Tur Rate)

कडधान्य बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीच्या दरात तेजी असल्याने शेतकरीही सध्या माल मागे ठेवत आहेत. सध्या बाजारातील आवक सरासरीच्या तुलनेत खपूच कमी आहे.

सध्या तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. यंदा उत्पादन कमी झाल्याने तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) कांदा आवकेचा दबाव टिकून (Onion Arrival)

राज्यातील कांदा आवक मागील काही दिवसांपासून आणखी काही वाढलेली दिसली. आवकेचा दबाव जास्त असला तरी सरासरी दरपातळी गेल्यामहिन्याच्या तुलनेत क्विंटलमागं १०० ते १५० रुपयाने सुधारलेली दिसली.

सध्या कांद्याला सरासरी ६०० ते ९०० रुपये भाव मिळतोय. मात्र पुढील काळात लाल कांदा आवक कमी होण्याचा अंदाज आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Chana Market
Chana Procurement : परभणीत हमीभावाने हरभरा खरेदी दोन केंद्रांवर सुरू

५) सध्या हरभरा बाजारभाव कसे राहील? (Chana Market)

नाफेडने कालपासून म्हणजेच १५ मार्चपासून हरभरा खरेदी सुरु केली. नाफेडने आत्ता महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात खरेदी सुरु केली. नाफेडने केरदी सुरु केल्यानंतर हरभरा दरालाही आधार मिळत आहे.

खुल्या बाजारातील हरभरा दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून येत आहे. नाफेडने देशात कालपर्यंत ७ हजार ६३३ टन हरभरा खरेदी केली. त्यापैकी महाराष्ट्रात एकाच दिवशी १ हजार ६३३ टन खरेदी केली. गुजरातमध्ये सर्वाधिक ३ हजार २९१ टन खरेदी करण्यात आली.

तर कर्नाटकातील खेरदी २ हजार ८७२ क्विंटलवर पोचली. राज्यात हरभरा काढणी जोमात सुरु आहे. पण मागील तीन दिवसांपासून अनेक भागात वादळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक बहुतांश शेतकरी यंदा उत्पादकता २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे सांगत आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती दिसते. त्यामुळे यंदा देशातील हरभरा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. उत्पादकता कमी आल्याचाही फायदा बाजाराला मिळू शकतो.

त्यातच सध्या नाफेडची खरेदी सुरु झाली. तूर, उडीद आणि मुगाचे दरही तेजीत आहेत. त्यामुळे दबावातील हरभरा दराला आधार मिळेल. सध्या हरभऱ्याला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. सध्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com