Soybean Market : देशातील सोयाबीन बाजार स्थिर का ?

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय.
soybean
soybean Agrowon
Published on: 
Updated on: 


अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन (Soybean Production) गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय. तसंच पामतेलाचे दरही मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम झाला? देशातील सोयाबीन बाजार कसा राहीला? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

soybean
Soybean Price: देशातील सोयाबीन बाजार स्थिर

1. कापसाचा बाजार सुस्तच


देशातील बाजारात सध्या कापसाचे दर काहीसे स्थिर आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही घटली. चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापूस दर कमी झाले होते. सध्या कापासाची आवक जवळपास ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळं कापसाचे दर टिकून आहेत. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उत्तर भारतातील सरासरी दर काहीसा जास्त आहे. अभ्यासकांच्या मते चालू महिन्यात कापूस बाजारात चढ उतार राहतील. मात्र जानेवारीपासून दरात सुधारणा होऊ शकते.
 

soybean
Soybean Rate : अमेरिकेत सोयाबीन तेजीत; देशात स्थिर का?

2. पामतेलाची आयात वाढली


भारताने यंदाच्या नोव्हेंबरमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खाद्यतेलाची आयात २६ टक्क्यांनी जास्त केली. नोव्हेंबरमध्ये १५ लाख ३८ हजार टन खाद्यतेलाची आयात झाली. यापैकी ७५ टक्के म्हणजेच ११ लाख ४१ हजार टन पामतेल आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरी तेलाचं प्रमाणं केवळ २५ टक्के होतं. पामतेलाच्या वाढत्या आयातीमुळेही सोयाबीन आणि मोहरी तेलाचे दर दबावात आले आहेत. त्याचा परिणाम सोयाबीन आणि मोहरीच्या दरावरही जाणवतोय. 

3. गहू तेजीतच राहणार

देशात सध्या गव्हाचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळं दरही तेजीत आहेत. प्रक्रिया उद्योगाकडून सरकारने खुल्या बाजारात गहू विक्रीची मागणी केली जातेय. मात्र यंदा सरकारकडील साठा कमी आहे. १ डिसेंबरला सरकारी गोदामांमध्ये केवळ ११५ लाख टन गहू होता. तो मगीलवर्षी याच तारखेला २१३ लाख टन होता. म्हणजेच यंदा गव्हाचा साठा जवळपास निम्मा आहे. गव्हाचे दर सध्या २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले. पुढील काळातही गहू दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

 4. संत्रा दर दबावात

बाजारात सध्या संत्र्याचे दर दबावात आहेत. बदलत्या वातावरणामुळे थेट खाण्यासाठी मागणी कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. त्यामुळं संत्र्याला सरासरी ३ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा सुरुवातीपासूनच संत्र्याला पाऊस आणि वाढलेल्या तापमानाचा फटका बसला. मात्र उत्पादन कमी राहूनही दर दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र उन्हाचा चटका वाढल्यावर संत्र्याचेही दर वाढू शकतात, असा अंदाज संत्रा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
 

5. अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय. उत्पादन आणि शिल्लक साठा जास्त दाखवल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसल्याचं सांगितलं जातं. तसंच पामतेलाचे दरही मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. त्याचाही दबाव सोयाबीनवर दिसतोय. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेलाच्या दरात किंचिंत घट झाली होती. मात्र सोयापेंडचे दर स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम देशातील दरावरही होतोय. आजही सोयाबीनचे दर स्थिर होते. सोयातेलाच्या दरात सुधारणा नसल्यामुळं बाजाराला आधार मिळत नाही, असंही जाणकारांनी सांगितलं. आज देशातील बाजारात सोयाबीनची जवळपास अडीच लाख क्विंटल आवक झाली होती. या सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात चढ उतार राहण्याचा अंदाज आहे. मात्र जानेवारी महिन्यात खाद्यतेलाचे दर वाढण्याचा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचेही दर वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com