
Pune News: केंद्र सरकारने गव्हाचे स्टाॅक लिमिट आणखी कमी केले. घाऊस व्यापाऱ्यासांठी गहू स्टाॅकची मर्यादा १ हजार टन होती. ती ७५ टक्क्यांनी कमी करून २५० टनांवर आणली. स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने स्टाॅक लिमिटची मर्यादा कमी केली.
देशातील गव्हाचे उत्पादन मागील ३ वर्षांपासून कमी होत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात चांगली सुधारणा झाली होती. तसेच खुल्या बाजारात गव्हाचे भाव तेजीत असल्याने सरकारची हमीभावाने गव्हाची खरेदी देखील कमी झाली. गेल्या हंगामात सरकारने जास्त उद्दीष्ट ठेऊनही केवळ २६२ लाख टन गहू खरेदी करता आला. देशातील गहू उत्पादनही घटले होते. परिणामी मागील वर्षभर देशात गव्हाचे भाव तेजीत होते. गव्हाने ३ हजारांचा टप्पा पार करून ३ हजार ५०० रुपयांपर्यंतही मजल मारली होती.
गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने वेळोवेळी स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकला. मात्र तरीही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत. केवळ गव्हाच्या भावातील वाढ थांबली. पण गव्हाचे भाव सरकारला अपेक्षित असे नव्हते. कारण नव्या हंगामातील गहू पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल. गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले तरच सरकारला शेतकरी गहू देतील. त्यामुळे गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट होते.
सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी ई लिलावातून गव्हाची विक्री वाढवली. सरकारने ई लिलावातून आठवड्याला ४ लाख टन गहू विकण्याचा निर्णय घेतला. यामुळे गव्हाचे भाव क्विंटलमागे ५० रुपयांपर्यंत कमी झाले. गहू २८०० ते ३ हजाराने विकला गेला. पण खुल्या बाजारात पुन्हा दरात सुधारणा झाली. त्यामुळे सरकारने स्टाॅक लिमिटची मर्यादाच कमी केली. यापुर्वी घाऊक व्यापाऱ्यांना १ हजार टन गहू स्टाॅकमध्ये ठेवता येत होता. मात्र सरकारने आता स्टाॅकची मर्यादा ७५ टक्क्यांनी कमी केली. आता व्यापाऱ्यांना केवळ २५० टन गहू ठेवता येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला.
देशातील वाढलेल्या उष्णतेचा गहू पिकाला फटका बसत आहे. देशात यंदा गव्हाची पेरणी वाढली. गेल्यावर्षीच्या ३१२ लाख हेक्टरवरून लागवड वाढली आणि ३२५ लाख हेक्टरवर पोचली. त्यातच पाऊसमान चांगले राहील्याने खरिपासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. परिणामी देशात यंदा गव्हाचे उत्पादन वाढेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण वाढत्या उष्णतेमुळे उत्पादकतेला फटका बसण्याची दाट शक्यता असल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळेच देशात गव्हाचे भाव वाढत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.