Nagpur News: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधीकरणाने (एफएसएसएआय) त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरून ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यदायी असल्याची पोस्ट केली होती. हा प्रकार म्हणजे इतर खाद्यतेलावर अविश्वास व्यक्त करण्यासारखा असल्याचे सांगत सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) यावर आक्षेप घेत ही पोस्ट तत्काळ हटविण्याची सूचना केली आहे. .‘सोपा’ने या संदर्भात ‘एफएसएसएआय’ला पत्र लिहिले आहे. या पत्रातील मजकुरानुसार, देशात सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे, सूर्यफूल, करडई, राईस ब्रॅन यापासून मिळणाऱ्या खाद्य तेलाचे उत्पादन होते. तसेत त्यांचा आहारात वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु ऑलिव्ह ऑइल हेच आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आल्याने इतर तेलांप्रती यामुळे अविश्वास निर्माण होतो..Edible Oil : खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरून आवाहन.विशेष म्हणजे ऑलिव्ह ऑइल हे अत्यंत महागडे खाद्यतेल आहे. देशातील उच्चभ्रू घटकांपैकी काही व्यक्तींनाच आहारात याचा वापर करणे शक्य होणार आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्येला ऑलिव्ह ऑइलचा आहारातील वापर परवडणारा नाही. त्यामुळे एकाच खाद्य तेलाला प्रोत्साहन देण्याची भूमिका बहुसंख्यकांवर अन्याय करणारी आहे..Soya Oil Import : जुलैमध्ये सोयातेलाची विक्रमी आयात.यातून दिशाभूल देखील होत असल्याने एफएसएसएआयने हे ट्विट तत्काळ हटविण्याची गरज आहे. एफएसएसएआयला खरंच सामान्यांच्या आरोग्याची काळजी असेल तर त्यांनी आहारात तेलाचा मर्यादित वापर तसेच पुनर्वापर टाळण्याचे आवाहन करणे अपेक्षित आहे. त्याऐवजी आरोग्यदायी म्हणून ऑलिव्ह ऑइलला प्रोत्साहन देण्याची भूमिका चिंताजनक असल्याचा आरोपही ‘सोपा’कडून करण्यात आला आहे..ठरावीक भागदारांचे हित जपण्याचा प्रयत्नविशेष म्हणजे ऑलिव्ह ऑइलची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. एफएसएसएआय सारख्या सार्वजनिक नियामक प्राधिकरणाने ऑलिव्ह ऑइलला आरोग्यदायी जाहीर केले. या क्षेत्रात काही ठरावीक भागधारक काम करतात. कदाचित या ठरावीक भागधारकांचे हित जपण्यासाठी म्हणूनच ‘एफएसएसएआय’कडून ही भूमिका घेण्यात आली की काय, असा सवालही ‘सोपा’ने पत्रातून उपस्थित केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.