Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन बाजारभाव, हरभरा भाव, तूर मार्केट

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे वायदे पुन्हा ११.९८ डाॅलर प्रतिबशेल्सवर होते. तर सोयापेंड ३४० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भावही कमी जास्त होताना दिसत आहेत. तर बाजार समित्यांमधील भावपातळी दबावातच होती.

बाजारात सोयाबीनला अद्यापही ४३०० ते ४५०० रुपयांच्या भाव मिळतोय. तर बाजातील आवकही टिकून आहे. पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील कापूस बाजारातही चढ उतार सुरुच आहेत. कापसाच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये १०० ते २०० रुपये कमी जास्त होत आहेत. कापूस सध्या ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील बाजारातील आवक ८१ हजार ८०० गाठींवर होती. वायद्यांमध्येही चढ उतार सुरु आहेत.

आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ९२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील मे महिन्याचे वायदे ६१ हजार २८० हजार प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Olam Sugar Factory : ओलम साखर कारखान्याकडून आता मका व तांदळापासून इथेनॉल निर्मिती

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे.

तर सरासरी भावपातळी  एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Market Update
Rohit Pawar : शासकीय आश्रमशाळेत कोट्यवधींचा दूध घोटाळा ; रोहित पवारांचे गंभीर आरोप

कांद्याच्या बाजारातील चढ उतार कायम आहेत. तर बाजारातील कांद्याची आवक वाढली आहे. बाजारात खरिप आणि उन्हाळ कांद्याचीही आवक होत आहे. कांदा भावात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार दिसत आहेत. कांद्याचा सरासरी भाव ११०० ते १३०० रुपयांच्या दरम्यान होता.

सरकारने काही प्रमाणात कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र ही निर्यात एनसीईएलच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळत नाही. त्यामुळे बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळद दरातील सुधारणा कायम आहे. यंदा हळद उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर सध्या बाजारातील आवकही मर्यादीत आहे. याचा आधार हळद बाजाराला मिळत आहे. हळदीचा सरासरी भाव सध्या १३ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत.

एनसीडीईएक्सवर हळद आज १८ हजार ७०० रुपयांवर होती. हळद बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता दराला चांगला आधार आहे. पण आवकेच्या हंगामात चढ उतारही दिसून येतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com