Tur Market : तुरीच्या भावावर आयातीचा दबाव येईल का? आफ्रिकेतून तुरीची आयात कधीपासून सुरु होईल?

Tur Rate : तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीचे भाव टिकून असल्याने सरकारची मात्र चिंता वाढली. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार धडपड करतंय. पण तुरीच्या दरवाढीचा दोर सरकारला आखडता येईना.
Tur
TurAgrowon

Tur Import : तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीचे भाव टिकून असल्याने सरकारची मात्र चिंता वाढली. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार धडपड करतंय. पण तुरीच्या दरवाढीचा दोर सरकारला आखडता येईना. पण आता आफ्रिकेतून तुरीची आयात सुरु होणार आहे. पण यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचे भाव मागील तीन महिन्यांपासून एका भावपातळीवर दिसतात. पण ही भावपातळी सरकारची डोकेदुखी ठरत आहे. बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तुरीचे भाव तेजीत असल्याने डाळीच्या भावाने चांगलीच उचल घेतली. बाजारातील तूर आवक कमी असल्याने दराला सातत्याने आधार मिळत आहे. त्यातच सध्या सणांमुळे तुरीला मागणी वाढलेली दिसते. यामुळे दर तेजीतच आहेत.

सणांच्या मागणीमुळे केवळ तूरच नाही तर मूग, उडीद, हरभरा, मसूर या सर्वच डाळींचे भाव वाढले आहेत. डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे.  सरकार याधीच तूर, उडीद आणि मसूरची आयात ३१ मार्च २०२४ पर्यंत शुल्कमुक्त केली आहे. म्हणजेच तूर, उडीद आणि मसूर आयातीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. तर सरकारने तूर आणि उडदावर स्टाॅक लिमिटही लावले आहे. मसूरसाठी भारत आयातीवर जास्त अवलंबून आहे. पण तूर आणि उडदावर स्टाॅक लिमिट लावल्यानंतरही भाव कमी झाले नाहीत.

तूर आणि इतर डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकार इतरही काही उपाय करू शकते. सध्या काबुली हरभरा आयातीवर ४० टक्के शुल्क आहे. तसेच मटार आयातीवर ५० टक्के आणि देशी हरभरा आयातीवर ६० टक्के शुल्क आहे. गरज पडल्यास सरकार हे आयात शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tur
Tur Market: आफ्रिकेतून आयात सुरु होणार; भाव पडतील का?

आफ्रिकेतील देशांमध्ये तुरीची काढणी आता शेवटच्या टप्प्याकडे जात आहे. आफ्रिकेत तूर खात नाहीत. हे देश निर्यातीसाठीच तुरीचे उत्पादन घेतले जाते. तेही भारतासाठी. कारण जगात भारत हा एकमेव तुरीचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. इतर देश भारताला निर्यातीसाठीच तुरीचे उत्पादन घेत असतात. आता आफ्रिकेतील माल बाजारात येत आहे. आफ्रिकेतील तूर भारतातही या महिन्याच्या शेवटीपासून दाखल व्हायला सुरुवात होऊ शकते. ऑक्टोबरपासून आयातीचे प्रमाण वाढू शकते.

आफ्रिकेतून तूर आयात वाढल्यास काही काळ दरावर दबाव येऊ शकतो. मात्र दर जास्त दिवस दबावात राहणार नाहीत. कारण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. देशातील तूर लागवड यंदा गेल्यावर्षीपेक्षाही घटली. त्यातच दुष्काळी स्थितीचा फटका पिकाल बसत आहे. त्यामुळे यंदा देशातील तूर मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काळातही तुरीचे भाव तेजीत राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com