Tur Rate : तुरीच्या दराने गाठला आठ हजार रुपयांचा पल्ला

राज्यभरातील प्रक्रिया उद्योजकांकडून तुरीला वाढती मागणी आहे. सध्या तुरीचा साठा संपत आल्याने तसेच नव्या हंगामातील तुरीची आवक होण्यास बराच कालावधी असल्याने बाजारात तुरीचे दर वधारले आहेत.
tur rate
tur rateagrowon

नागपूर : कळमना बाजारासह विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीने (Tur Rate) आठ हजार रुपयांचा पल्ला गाठला. हंगामातील नव्या तुरीची आवक (Tur Arrival) होण्यास सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. परिणामी येत्या काळात मागणी (Demand Of Tur) वाढल्याने तुरीचे दर (Tur Market Rate) ९ हजार रुपयांपर्यंत जातील, अशी शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

tur rate
Tur : आयात तुरीतील तेजी बाजाराच्या पथ्यावर?

राज्यभरातील प्रक्रिया उद्योजकांकडून तुरीला वाढती मागणी आहे. सध्या तुरीचा साठा संपत आल्याने तसेच नव्या हंगामातील तुरीची आवक होण्यास बराच कालावधी असल्याने बाजारात तुरीचे दर वधारले आहेत. कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात ७००० ते ७८७५ असा दर तुरीला होता. त्यानंतर तुरीचे दर ७७०० रुपयांवर पोहोचले. सद्यःस्थितीत तुरीच्या दराने ७१५० ते ८०११ रुपयांचा पल्ला गाठला. येत्या काळात दरात आणखी सुधारणा होत दर ९ हजार रुपयांवर पोहोचतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

tur rate
Tur Rate : हिंगोलीत तूर ७००० ते ७५६० रुपये

बाजारात भुईमूग शेंगांचे दर मध्यंतरी ३५०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले होते. भुईमूग शेंगांच्या दरातही काहीशी वाढ नोंदविण्यात आली. ४००० ते ५००० रुपये असा दर सध्या भुईमुगाला मिळत असल्याचे सांगण्यात आले. भुईमुगाची ७० क्विंटलची आवक होत आहे. बाजारात सोयाबीन आवक नियमित असून ती ३७६ क्विंटल आहे. सोयाबीनचे दर ५४०० ते ६२०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारातील हरभरा आवक २८४ क्विंटल असून ४३०० ते ४८०० असा दर आहे. गव्हाच्या दरातदेखील काहीशी सुधारणा अनुभवण्यात आली. २३५४ ते २४०४ असा दर गव्हाचा आहे. तर आवक ४०० क्विंटल नोंदविण्यात आली. तांदळाची आवक ३१ क्विंटल तर दर २७०० ते ३००० रुपये होते.

बाजारातील कांद्याची आवक दोनशे क्विंटल असून पांढऱ्या कांद्याचे दर १००० ते १५०० रुपये होते. लसूण आवक २८० क्विंटल तर दर ५०० ते ४००० रुपये होते. आले आवक १०० क्विंटल इतकी असून ३२०० ते ३६०० रुपयांनी आल्याचे व्यवहार झाले. वाळलेल्या मिरचीची आवक २९९ क्विंटल झाली. मिरचीच्या दरात तेजी असून सध्या दर दहा हजार ते १६ हजार रुपये क्विंटल झाले. आहेत येत्या काळात मिरचीच्या दरात चढ-उतार होत राहतील, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

टोमॅटोचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कमी झाले. २००० ते २५०० असा दर गेल्या आठवड्यात टोमॅटोला होता. या आठवड्यात त्यात घसरण होत १२०० ते १५०० रुपयांपर्यंत ते खाली आले. बाजारातील टोमॅटोची आवक ८०० क्विंटल आहे. चवळीच्या शेंगांची आवक ७० क्विंटलच्या घरात असून ४००० ते ५००० रुपयांवर दर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात चवळी शेंगाचे दर १५०० ते २००० रुपये होते. चवळी शेंगांच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचे सांगण्यात आले. बाजारात भेंडीची आवक १३० क्विंटल आहे. ३५०० ते ४००० रुपयांचा दर गेल्या आठवड्यात भेंडीला होता. या आठवड्यात ४००० ते ४२०० रुपयांवर दर पोहोचले. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक नियमित आहे. ती गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली असली तरी सरासरी ५०० क्विंटलची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरव्या मिरचीला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळत आहे.

फळ मार्केट

केळीला मागणी वाढली; दरात सुधारणा

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने बाजारात केळीला मागणी वाढली आहे. त्याच्या परिणामी ४५० ते ५०० रुपये या दरावर स्थिर असलेल्या केळीच्या दरात सुधारणा नोंदविण्यात आली. १५०० ते १८०० रुपये क्विंटलचा दर मध्यंतरी केळीला मिळाला. त्यानंतर मात्र पुन्हा दर खाली आले, असे सांगण्यात आले. सध्या केळीची आवक अवघी १४ क्विंटल आहे. डाळिंबाची आवक वाढली असून ती १३७ क्विंटलवर पोहोचली आहे. २००० ते १२ हजार रुपयांचा दर डाळिंबाला मिळत आहे. बाजारातील आंब्याची आवक ३४ क्विंटल असून दर २००० ते २५०० रुपये झाले आहेत. आंब्याला सुरुवातीला चार हजार ते पाच हजार रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com