वाटाणा, वाल शेंगासह भाजीपाल्याच्या दरात तेजी

कलिंगड, खरबुजाची आवक चांगली, भुसारची आवकही वाढली
Watermelon
WatermelonAgrowon
Published on
Updated on


नगर, : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्यात (Vegetables) वाटाण, वाल शेंगासह अन्य भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम होती. कलिंगड, खरबुजाची आवक चांगली असून भुसारची आवक वाढली आहे.
नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारणपणे १३०० ते १४०० क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे. उन्हाळ्यामुळे दरात (Summer Rate High) तेजी कायम आहे. वाटाण्याची (Peas) दर दिवसाला २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. वाल शेंगाची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ४५०० रुपयाचा दर मिळाला.

Watermelon
कांदा, टोमॅटोच्या दरात घसरण

टोमॅटोची १३३ ते १४० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, वांगीची ३७ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५००, फ्लावरची (flowers) ५० ते ६० क्विंटलची आव होऊन ५०० ते २५००, कोबीची ९६ ते १०० क्विंटलवची आवक होऊन ७०० ते १ हजार, काकडीची ८४ ते ९० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, गवारची साधारण १० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ८ हजार, घोसाळ्याची १२ ते १४ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, दोडक्याची १४ ते १८ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३ हजाराचा दर मिळाला.

कारल्याची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन १५०० ते ४ हजार, भेंडीची ६० ते ७० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, बटाट्याची १४५ ते १५० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १७००, हिरव्या मिरचीची ८४ ते ९० क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ९ हजार, दुधी भोपळ्याची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन ३०० ते १ हजार, शिमला मिरचीची ४३ ते ४५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला आहे. शेवग्याची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १६०० रुपयाचा दर मिळत आहे. पहिल्यांदाच शेवग्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. आद्रकलाही मागणी चांगली असून १५०० ते ३ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. पालेभाज्यात कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, (Cilantro, fenugreek, spinach, chawli )चवळीलाही चांगली मागणी आहे.

फळे, भुसारची आवक वाढली (Increased inflow of fruits)
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे, भुसार मालाची आवक वाढली आहे. फळात कलिंगड, खरबूज, संत्रा, मोसंबी, द्राक्षाला (Grapes) चांगली मागणी आहे. कलिंगडाला ३०० ते १५०० तर खरबुजाला ५०० ते ३ हजार रुपयाचा दर मिळाला आहे. द्राक्षाला २ ते ४ हजार ५०० रुपयाचा दर मिळत आहे. भुसारमध्ये हरभरा, (Gram) तुरीसह (Tur) चिंचाची आवक वाढली आहे. दररोज तीन हजार क्विटंलपर्यत शेतमाल बाजार समितीत येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com