Wheat Auction: एफसीआयच्या गहू लिलावाला चांगला प्रतिसाद; सणांमुळे गव्हाला मागणी वाढली

Wheat Market : देशात गव्हाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे केंद्राने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. बुधवारी (ता.२) गव्हाच्या ऑनलाईन लिलावाचा ६ वा टप्पा पार पटला. या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला.
Wheat Market
Wheat MarketAgrowon

Wheat Market Rate : नवी दिल्ली: देशात गव्हाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे केंद्राने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. बुधवारी (ता.२) गव्हाच्या ऑनलाईन लिलावाचा ६ वा टप्पा पार पटला. या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे सरकारने या लिलावासाठी विक्री किमतीत वाढ केली होती. लिलावात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक २ हजार ५०० रुपये भाव मिळाला.

देशातील काही बाजारांमध्ये गव्हाचे भाव प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. यंदा देशातील गहू उत्पादन घटल्याने निर्यातबंदी असूनही भाव वाढले. पुढील काळात सण आहेत. सणांमुळे गव्हाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार भारतीय अन्न महामंडळ अर्थात एफसीआयच्या माध्यामातून गव्हाची विक्री करत आहे. आतापर्यंत लिलावाचे एकूण टप्पे पार पडले. यापैकी नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला. या लिलावासाठी सरकारने १ लाख ९ हजार टन गहू निश्चित केला होता. त्यापैकी जवळपास ९७ टक्के गव्हाची विक्री झाल्याचे एफसीआयने स्पष्ट केले. 

बुधवारी पार पडलेल्या लिलावासाठी सरकारने विक्री किमतीत प्रतिक्विंटल २६ रुपयांची वाढ केली होती. सहव्या लिलासाठी एफसीआयने २ हजार १२५ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. पण या लिलावात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये सर्वादिक २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. हा भाव सर्वाधिक ठरला.

Wheat Market
मध्य प्रदेशमधील गव्हाला मागणी वाढली

मध्यप्रदेशात २ हजार ४३० रुपये, गुजरातमध्ये २ हजार ४१० रुपये, झारखंडमध्ये २ हजार ४०५ रुपये, ओडिशामध्ये २ हजार ४०० रुपये आणि उत्तराखंडमध्ये २ हजार ३५० रुपयांचा भाव मिळाला. कर्नाटकात २ हजार २७५ रुपये आणि केरळमध्ये २ हजार ३२० रुपये प्रतिक्विंटलचा भाव लिलावात मिळाला. एकूण सहाव्या लिलावाचा विचार करता सरासरी २ हजार २०८ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

तांदळाला मात्र या लिलावात आधिपेक्षा कमी भाव मिळाला. तांदळाला या लिलावात प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार १२४ रुपये किंमत मिळाली. या टप्प्यात १५० टन तांदळाचा लिलाव पार पडला. आधिच्या लिलावात १०० टनांची विक्री झाली होती. तांदळाची विक्री यापुढेही अशीच सुरु राहण्याचा अंदाज आहे. पण केंद्राने बिगर बासमीत पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंद घातल्याने देशातील भाव काहीसे कमी झाले. यामुळे व्यापाऱ्यांनी सरकारकडे तांदूळ लिलावाच्या राखीव किमतीत कपात करण्याची मागणी केली. सध्या सरकारने लिलावासाठी प्रतिक्विंटल ३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव निश्चित केला आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com