फळांच्या आवकेत चांगलाच चढ-उतार

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गत आठवडाभरात सफरचंद, गाजर, चिकू, अंजीर, द्राक्ष, खरबूज, लिंबू, आंबा,कैरी, चिंच व कलिंगड साधी फळांच्या आवकेत चांगलाच चढ-उतार पाहायला मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
Fruit Arrival
Fruit ArrivalAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गत आठवडाभरात सफरचंद (Apple), गाजर (Carrot), चिकू, अंजीर, द्राक्ष (Grape), खरबूज (Musk Melon), लिंबू, आंबा (Mango), कैरी, चिंच व कलिंगड साधी फळांच्या आवकेत (Fruit Arrival) चांगलाच चढ-उतार पाहायला मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २५ ते ३० एप्रिल दरम्यान सफरचंद,गाजर, चिकू, अंजीर, द्राक्ष, खरबूज, लिंबू,आंबा, कैरी, चिंच व कलिंगड आदी पिकांच्या आवकेत चढ-उतार राहिला. आठवडाभरात केवळ दोन वेळा मिळून ५६३ क्विंटल आवक झालेल्या सफरचंदाचे सरासरी दर १२ हजार ५०० ते १४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. सफरचंदाची केवळ दोन वेळा अनुक्रमे ३४० व २२३ क्विंटल आवक झाली. गाजराची एकूण आवक ७६ क्विंटल राहिली. १६ ते ४० क्विंटल दरम्यान तीन वेळा आवक झालेल्या गाजराला सरासरी १७५० ते १९०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. चिकूची एकूण १९२ क्‍विंटल आवक झाली १५ ते ६४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या चिकूला सरासरी १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

अंजिराची केवळ २५ क्विंटल आवक झाली. ४ ते ६ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या अंजिराला सरासरी ३७५० ते ४२५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. द्राक्षाची एकूण आवक १४३ क्विंटल झाली. २५ ते ४३ क्विंटल दरम्यान कमी अधिक आवक झालेल्या द्राक्षाचे सरासरी दर २६०० ते ४२५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. सर्वाधिक २८५३ क्विंटल आवक झालेल्या खरबूजला सरासरी १२०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. खरबुजाची आवक ३४० ते ११०७ क्विंटल दरम्यान झाली. लिंबूची एकूण आवक ८८ क्विंटल झाली.१२ ते २३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या लिंबूला सरासरी ७५०० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. आंब्याची आवक ४३२ क्विंटल झाली. ५७ ते १२४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या आंब्याला सरासरी १० हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. कैरीची आवक ८२६ क्विंटल झाली ८८ ते ३०४ क्विंटल दरम्यान कमी-अधिक प्रमाणात आवक झालेल्या कैरीला सरासरी १२५० ते १३५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

चिंचेची तीन वेळा आवक

औरंगाबाद बाजार समितीमध्ये चिंचेची गत आठवड्यात तीन वेळा मिळून १३६ क्विंटल आवक झाली. अनुक्रमे ५४,५१ व ३१ क्विंटल आवक झालेल्या या चिंचेला ५२५० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. दुसरीकडे कलिंगडाची सर्वाधिक ४०३० क्‍विंटल आवक झाली. ४२३ ते १४१० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या कलिंगडाला सरासरी ६०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com