Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Raisin Deal Closed Update : दसऱ्यानंतर बेदाणा सौदे मोठ्या प्रमाणावर होतात. दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बेदाणा सौदे बंद ठेवले जातात. मुदत संपली तरी अद्याप व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे शून्य पेमेंट पूर्ण केले नाही. शून्य पेमेंटसाठी आणखी चार दिवस सौदे बंद ठेवले जाणार आहेत.
Raisins
RaisinsAgrowon
Published on
Updated on

Sangli News : दसऱ्यानंतर बेदाणा सौदे मोठ्या प्रमाणावर होतात. दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बेदाणा सौदे बंद ठेवले जातात. मुदत संपली तरी अद्याप व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे शून्य पेमेंट पूर्ण केले नाही. शून्य पेमेंटसाठी आणखी चार दिवस सौदे बंद ठेवले जाणार आहेत. या काळातही पेमेंट दिले नाही, तर संबंधित व्यापाऱ्यास सौद्यात बंदी घातली जाणार आहे, असा निर्णय बेदाणा संघटनेच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी निवेदनात म्हटले आहे, की अनेक बेदाणा व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट केले नाही, झिरो पेमेंट झाले नसल्याने, अनेक व्यापारी काळ्या यादीत आहेत व निवडणुकीनिमित्त बेदाणे सौदे बंद राहिले. सोमवारपासून (ता. २५) सौदे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेतला आहे.

Raisins
Raisin Market : बेदाण्याच्या दरात किचिंत वाढ

प्रतिवर्षीप्रमाणे सांगली, तासगाव बेदाणा असोसिएशनच्या वतीने व्यापारी येणे-देणे म्हणजे ‘शून्य पेमेंट’ हा उपक्रम राबवण्यात येतो. सांगली, तासगाव, पंढरपूर, विजापूर, सोलापूर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पण, अडत्याचे, शेतकऱ्याचे व व्यापाऱ्याचे पैसे बुडू नयेत, यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शून्य पेमेंट ही संकल्पना अमलात आणली आहे. त्याचा संपूर्ण देशभर व्यापाऱ्यांमध्ये प्रभाव आहे.

Raisins
Raisin Export : ‘सल्फर’ बनले बेदाणा निर्यातीमधील अडथळा

चालू वर्षी माल कमी व दर चांगला व निवडणुकीचा काळ असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी झिरो पेमेंट केले नाही. बेदाणा असोसिएशनकडे सांगली व तासगाव येथील अडत्यांनी मोठ्या प्रमाणात पेमेंट आले नसल्याच्या चिठ्ठ्या दिल्याचे समजते. अनेक व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये अडकल्याने व येणे बाकी असल्याने बेदाणा असोशिएशनने सोमवारी सौदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१६ ऑक्टोबरपर्यंतचे पेमेंट २१ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पेमेंट देण्याबाबत निवेदन दिले होते. अनेक अडत्यांनी पेमेंट आले नसल्याच्या चिठ्ठ्या दिल्या होत्या. मोठ्या प्रमाणात पेमेंट येणे बाकी व निवडणुकीचा काळ धरून बेदाणा असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बेदाणा सौदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत सर्व व्यापाऱ्यानी उर्वरित पेमेंट द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत ज्यांनी पेमेंट दिले नाही त्यांना सौद्यात सहभाग करू दिला जाणार नाही, असे ठरले. बैठकीस संजय बोथरा, राजू माळी यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com