Raisin Export : ‘सल्फर’ बनले बेदाणा निर्यातीमधील अडथळा

Sulfur Update : उत्तम भौगोलिक स्थिती, भरपूर कच्चा माल आणि शेतकऱ्यांचे पाठबळ असूनही राज्याच्या बेदाण्याला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवता आलेले नाही.
Raisin Export
Raisin Export Agrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तम भौगोलिक स्थिती, भरपूर कच्चा माल आणि शेतकऱ्यांचे पाठबळ असूनही राज्याच्या बेदाण्याला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवता आलेले नाही. भारतीय बेदाण्याला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल तसेच ‘सल्फर’च्या वापरापासून बाजूला व्हावे लागेल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

राज्यातून गेल्या हंगामात ४७ हजार टन बेदाण्याची निर्यात झाली होती. देशातील सर्वात मोठी बेदाणा बाजारपेठ सांगलीची आहे. २५ हजार टनाहून अधिक बेदाणा तेथे साठवून ठेवला जातो. मात्र, घरात भरपूर माल असला तरी देशी व्यापारी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला पसंती देतात. अफगाण बेदाणा एकसारखा, हिरवा व गोड असतो,

Raisin Export
Bedana Market : बेदाणा दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ

हे त्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. जगाची बेदाणा बाजारपेठ १३ लाख टनांच्या पुढे पोहोचली आहे. परंतु, उच्च दर्जा, एकसारखेपणा, कीटकनाशक उर्वरित अंशमुक्तपणाचे (रेसिड्यू फ्री) योग्य प्रमाण या तीन निकषांत भारतीय बेदाणा बाजारपेठेत स्थान मिळवत नसल्याची खंत बेदाणा उद्योगाला आहे. विदेशी बाजारपेठांपेक्षा राज्याच्या बेदाण्याचे देशी ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित करावे,

अशीदेखील सूचना आता या उद्योगातील काही जण करीत आहेत. सांगली, तासगाव, पंढरपूर, पिंपळगावच्या बेदाण्याने देशी बाजारपेठांवरच लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी त्यासाठी सल्फर अर्थात गंधकाचा वापर शून्यावर आणावा. सुकामेवाऐवजी पोषणमूल्य असलेले खाद्य म्हणून बेदाण्याचा प्रचार प्रसार करावा, असा सल्ला दिला जात आहे. मात्र, त्याचा अद्यापही गांभीर्याने विचार केलेला नाही.

Raisin Export
Bedana Market : बेदाण्याची चार महिन्यांत ९५ हजार टन विक्री

फलोत्पादन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही घटकाला बेदाणा उत्पादन तंत्राबाबत जागृत करावे लागेल. ही बाब मुख्यत्वे पणन विभागाने करायला हवी. बेदाणा उत्पादनाची तंत्र बदलल्याशिवाय बेदाणा उत्पादनाची गुणवत्ता वाढणार नाही. मागणी न वाढल्यास उत्पादनही वाढणार नाही. गुणवत्ता आल्यास देशांतर्गत बेदाणा खरेदीलादेखील वेग येईल.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात बेदाणा निर्मितीत अजूनही गंधकाभोवती अडकून आहे. देशी बेदाण्याची खरेदी वाढविण्यात स्थानिक कॉर्पोरेट क्षेत्रही इच्छुक आहे. परंतु, आधी गंधकाचा वापर थांबवा, गुणवत्ता आणा, अशी मागणी कॉर्पोरेट क्षेत्राची आहे. त्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना मदत, मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा ही मुख्य अडचण आहे.

गंधकाचा वापर न करता टर्की, इराणने बेदाण्याची गुणवत्ता उच्च ठेवली आहे. या देशांच्या मालाचे दर भारतीय बेदाण्यापेक्षा दुप्पट असूनही जगात त्याच मालास मागणी असते. राज्याच्या बेदाण्याला देशीविदेशी बाजारपेठेत कायमचे चांगले स्थान हवे असल्यास गंधकाच्या समस्येतून बाहेर पडावे लागेल.
रौनक बाफना, निर्यातदार, तासगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com