Maize Arrival : खानदेशात मक्याची आवक सुरू

मक्याची ऑक्टोबरमध्येही लागवड खानदेशात झाली होती. अनेकांनी परतीच्या पावसात ही लागवड केली होती.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Maize Market News ः खानदेशातील बाजारांत मक्याची आवक (Maize Arrival) सुरू झाली आहे. आवक सध्या कमी आहे. कमाल दर (Maize Rate) २४०० रुपये प्रतिक्विंटल तर किमान दर २२०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.

पुढे आवक वाढेल, असे चित्र आहे. खानदेशात मिळून सध्या प्रतिदिन ५०० क्विंटल मक्याची आवक (Maize Import) होत आहे.

मक्याची ऑक्टोबरमध्येही लागवड खानदेशात झाली होती. अनेकांनी परतीच्या पावसात ही लागवड केली होती. या आगाप लागवडीच्या क्षेत्रात कापणी सुरू आहे.

काही शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्येदेखील लागवड केली होती. या क्षेत्रातही मळणी सुरू आहे. या आगाप लागवडीच्या मका पिकात दर्जेदार उत्पादन हाती आले आहे.

Maize
Maize Market : देशात मक्याला मागणी कायम; निर्यात वेगाने सुरु

काळ्या कसदार, मध्यम जमिनीत अनेकांनी लागवड केली होती. मध्यम जमिनीत मळणी सुरू आहे. काळ्या कसदार जमिनीच्या क्षेत्रात कापणी होत आहे. कारण काळ्या कसदार क्षेत्रात ओलावा टिकून राहतो. यामुळे दाणे पक्व झाले, पण त्यात आर्द्रता आहे.

ही आर्द्रता नाहीशी करण्यासाठी मका कणसांची खुडणी करून ती वाळविण्यासाठी शेतात ठेवण्यात आली आहेत. यामुळे मका आवक रखडत सुरू आहे.

Maize
Jalgaon News: खानदेशात मका आवक अल्प

मक्याची लागवड यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीतही अनेकांनी केली आहे. यामुळे आवक सुरूच राहणार आहे. मार्चअखेरिस आवक वाढेल, असे चित्र आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या मक्याची आवक मार्चअखेर होईल.

नोव्हेंबरमध्ये खानदेशात अधिकची मका लागवड झाली आहे. यंदा सुमारे ४० हजार हेक्टरवर खानदेशात मक्याची लागवड झाली होती. पीक जोमात आहे.

मध्यंतरी अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप पिकात झाला होता. या पिकात दोन-तीनदा फवारण्या घ्याव्या लागल्या. त्यामुळे पिकाच्या उत्पादकतेवर परिणामही झाला आहे. यामुळे काही भागात उत्पादन कमी येईल, असेही संकेत आहेत.

सध्या खानदेशात मिळून ५०० क्विंटल एवढीच मक्याची आवक होत आहे. शेतकऱ्यांकडून ही आवक होत आहे. मध्यंतरी फक्त व्यापाऱ्यांमध्ये मक्याचे व्यवहार सुरू होते. पण आता शेतकऱ्यांनाही या सुरुवातीच्या दरांचा लाभ मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

मक्याला उठावही आहे. पोल्ट्री, स्टार्च उद्योग व खाद्य पदार्थांसाठी प्रक्रिया उद्योगातही मोठी मागणी आहे. बाजार सुरळीत असल्याने लिलावही वेगात सुरू आहेत.

या भागांतून आवक सुरू...

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा येथील बाजारात आवक होत आहे. तसेच धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार येथील बाजारात मका आवक होत आहे. अमळनेर येथे अधिकची आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com