Wheat Production : युरोपियन युनियनमध्ये मका, गहू उत्पादन घटणार?

अतिपाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ, पूर, भूस्खलन, हिमस्खलन, हिमनग वितळणे आदी घटना वाढल्या आहेत. यामुळे मानवी जिवनावर परिणाम होत आहे. या वातावरण बदलाचा शेतीलाही मागील ७ वर्षांपासून जास्त फटका बसत आहे.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon

पुणेः जगातील अनेक देशांना यंदा दुष्काळाचा (Drought) फटका बसत आहे. मात्र युरोपियन युनियनमधील देशांना दुष्काळाच्या (European Union Drought) झळा जास्तच जाणवत आहेत. आधी अतिउष्णतेमुळे शेतीची (Excessive Heat Hit Agriculture) होरपळ केली. तर आता दुष्काळामुळं पिकांना (Crop Damage Due To Drought) तडाखा बसत आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमधील मका, गहू, सोयाबीन आणि सू्र्यफूल उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Wheat Production
Maize : मका ‘हब’वर लष्करी अळीचे आक्रमण

जगाला बदलत्या वातावरणाचा मागील काही वर्षांपासून फटका बसत आहे. अतिपाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ, पूर, भूस्खलन, हिमस्खलन, हिमनग वितळणे आदी घटना वाढल्या आहेत. यामुळे मानवी जिवनावर परिणाम होत आहे. या वातावरण बदलाचा शेतीलाही मागील ७ वर्षांपासून जास्त फटका बसत आहे. तर यंदा अतिपाऊस, पूर आणि दुष्काळामुळे शेतीचे नुकसान वाढले आहे. युरोपियन ड्राॅट ऑब्जर्वेटरीच्या अहवालानुसार यंदा जागतील तब्बल १३५ देशांना दुष्काळाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसत आहे. या देशांमध्ये आधी उष्णतेची लाट आली आणि त्यानंतर आता कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली.

Wheat Production
Wheat export: गहू निर्यातबंदी रिलायन्सच्या पथ्यावर

दुष्काळाचा सर्वाधिक फटका यंदा युरोपियन युनियनला बसत आहे. यरोपातील अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आणि कमी पावसामुळे स्थिती बिकट बनली आहे. युरोपियन युनियनमधील स्पेन, फ्रान्स, इटली, अल्बेनिया, बोस्निया, हर्जेगोविना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या देशांना दुष्काळाच फटका बसतो आहे.

जगाला गहू पुरवठ्यात युरोपियन युनियनचा मोठा वाटा आहे. जगाच्या एकूण गहू निर्यातीपैकी तब्बल ३० टक्के युरोपियन युनियन पुरवतो. मात्र २०२२-२३ च्या हंगामात येथे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता व्यक्त आहे. युरोपियन युनियनमधील गहू काढणी सध्या संपली आहे. पण पिकाला शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाई आणि उष्णतेचा फटका बसला.

युरोपियन युनियनमध्ये मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदा युरोपियन युनियनमधील मका लागवड गेल्यावर्षीक्षा कमी राहून उत्पादकता १३ टक्क्यांनी कमी राहीली. तर उत्पादन ६०० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. युरोपियन युनियनमधील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये सिंचनावर मका पीक घेतलं जातं. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्याने वापरावर मर्यादा घातल्या जात आहेत.

युरोपियन युनियनमधील मका, सोयाबीन आणि सूर्यफुल पीक ऐन फुले आणि दाणे भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस नव्हता. दुष्काळामुळे युरोपियन युनियनमध्ये चराई क्षेत्र कमी झाले. तर पशुखाद्य उत्पानातही मोठी घट झाली. गाई आणि मेंढ्यांना खाद्याची टंचाई निर्माण होत आहे.

स्पेनमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. येथील संशोधकांच्या मते यंदा देशात अभुतपूर्व स्थिती निर्माण झाली. दुष्काळामुळे स्पेनमधील कधीही न आटणारे जलाशये यंदा आटली. स्पेनमधील पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांमध्ये निम्मापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. स्पेनमध्ये सध्या पिण्याचा पाणीसाठा ४० टक्क्यांवर आला, असं येथील संशोधकांनी सांगितले. स्पेनमध्ये अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. तर ज्या भागात पेरण्या झाल्या तेथे पिकाचं पावसाअभावी भवितव्य अधांतरीत आहे.

यरोपियन युनियन मधील मका उत्पादन घटल्याचा फायदा भारतीय मक्याला होऊ शकतो. भारतातूनही मका निर्यात होत असते. युरोपियन युनियनमधून मका निर्यात कमी झाल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मक्यचा पुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे भारताला मका निर्यातीसाठी संधी आहे. पण यंदा भारतातही मक्याचा कमी पुरवठा आहे. त्यामुळे देशात सध्या दर तेजीत आहेत. मक्याला सध्या २ हजार ४०० ते २ हजार ६०० रुपये दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्यास मका दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

दुष्काळाची झळ बसलेले देश

स्पेन, फ्रान्स, इटली, अल्बानिया, बोस्निया, हर्जेगोविना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया.

या पिकांचे उत्पादन घटणार

मका, गहू, सोयाबीन, सूर्यफूल आणि चारापिके

………

पाणीटंचाईची स्थिती

- अनेक तलाव आटले

- लहान नद्या कोरड्या पडल्या

- पिकांना सिंचन करण्यावर मर्यादा

- काही भागांत पिकांसाठी पाणी बंद

- अनेक शहरांची पाणीकपात

- शेकडो गावे पाणीटंचाईच्या विळख्यात

- पाण्याअभावी पशुपालन अडचणीत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com