Mango Promotion: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील ड्युपाँट सर्कल येथे आयोजित ‘टेस्ट द ट्रॉपिकल मॅजिक’ या वार्षिक आंबा महोत्सवाला हजारो नागरिकांनी भारतीय आंब्यांचा स्वाद अनुभवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील भारतीय दूतावासाच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात केसर, लंगडा, मालदा आदी भारतीय आंब्यांच्या विविध जातींची चव रसिकांनी घेतली..यंदाच्या महोत्सवासाठी ८ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली होती. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या पाच केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. गेल्या वर्षी एका केंद्रच उभारण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने यंदा कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला..Mango Price Crash: आंबा उत्पादक शेतकरी संकटात, भाव ३ रुपये किलोवर, तोडणी बंद, २० रुपये हमीभावाची मागणी.भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांसह स्थानिक नागरिकांनीही भारतीय आंब्यांचे कौतुक केले. भारतीय वंशाच्या दिशा यांनी लहानपणी भारतात व्यतित केलेल्या उन्हाळी सुट्ट्यांत चाखलेल्या आंब्यांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले. तर अमेरिकेत फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी आलेल्या अँड्र्यू यांनी केसर आंबा हा आपण खाल्लेल्या सर्वांत चविष्ट आंब्यांपैकी असल्याचे म्हटले..भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी हा कार्यक्रम केवळ भारतीय आंब्यांचा नव्हे, तर भारतीय खाद्यसंस्कृतीचा उत्सव असल्याचे सांगितले. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा खाद्यप्रसार उपक्रमांचे आयोजन अधिक वारंवार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘काय बी एक्स्पोर्ट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल खाकर यांनी भारतीय आंबे अमेरिकेत ताजे पोहोचावेत, यासाठी जलद पुरवठा साखळी उभारण्यात यश आल्याचे सांगितले..Indian Mango Export: भारतीय आंब्याची यंदा ४५ देशांत निर्यात.आंब्यांची निर्यात सातत्याने वाढती : देवदरम्यान, कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) अध्यक्ष अभिषेक देव यांनी अमेरिकेला भारतीय आंब्यांची निर्यात सातत्याने वाढत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी अमेरिकेला २,३०० टन आंब्यांची निर्यात झाली होती. यंदा हा आकडा हंगाम संपण्यापूर्वीच ओलांडण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. .भारतीय आंब्यांना अमेरिकन बाजारपेठ २००६ मध्ये खुली झाली. आंब्यावरील ‘मँगो सीड वीव्हिल’ या किडीच्या धोक्यामुळे लागू असलेली आयातबंदी कमी मात्रेतील किरणोत्सर्ग प्रक्रियेनंतर हटविण्यात आली. त्यानंतर भारतीय आंब्यांची अमेरिकेतील मागणी सातत्याने वाढत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.