MASMA: महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

Maharashtra Solar Industry: नवीन कार्यकारिणीमध्ये यंदा नाशिकचे अमित कुलकर्णी हे अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत, तर कोल्हापूरचे प्रदीप खाडे उपाध्यक्ष, पुण्याचे सहज मुथा सचिव, तर कोशाध्यक्ष म्हणून चिन्मय कुलकर्णी यांची नियुक्ती झाली.
Maharashtra Solar Manufacturers Association
Maharashtra Solar Manufacturers AssociationAgrowon
Published on
Updated on

Pune News: दि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (मास्मा) वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. नवीन कार्यकारिणीमध्ये यंदा नाशिकचे अमित कुलकर्णी हे अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत, तर कोल्हापूरचे प्रदीप खाडे उपाध्यक्ष, पुण्याचे सहज मुथा सचिव, तर कोशाध्यक्ष म्हणून चिन्मय कुलकर्णी यांची नियुक्ती झाली.

सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले १०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. तत्कालीन अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी मागील वर्षाच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा सभेसमोर मांडला. कोशाध्यक्ष समीर गांधी यांनी मागील वर्षाचा आर्थिक अहवाल सादर केला, जो सर्व सदस्यांनी एकमताने संमतीने स्वीकारला. अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.

Maharashtra Solar Manufacturers Association
CM Solar Scheme: राज्यात १०७१ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारणार : फडणवीस

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, नागपूर इत्यादी भागांतील सदस्यांनी या सभेमध्ये उपस्थित राहून सहभाग नोंदवला. ही वार्षिक सभा अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली, जिथे सर्व सदस्यांनी सहभाग घेत आपला आनंद व्यक्त केला.

‘मास्मा’चे संचालक मंडळ समीर गांधी, भर्तेश धुली, राजेंद्र पांचाल, नितीन कुलकर्णी, अक्षय पांचाल, स्वप्नील बाठे, मनीषा बारबिंद, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, राजेश मुथा व रोहन उपसनी इत्यादींचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

Maharashtra Solar Manufacturers Association
Agriculture solar Pump : सौर कृषिपंपांसंबंधीच्या समस्या सोडविण्यासाठी ऑनलाइन सुविधा

नवीन अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी ‘मास्मा’च्या भविष्यातील विकासदृष्टिकोनावर भाष्य केले व विविध नवकल्पनांची मांडणी केली. ज्यात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला उद्योजकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पांडे व अतुल होनोले यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या आयोजनामध्ये अतुल होनोले, नितीन कुलकर्णी, प्रदीप खाडे, धनाजी एकल, अभिजित विचारे व कोल्हापूर टीममधील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com