Bhopal News: शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि शेती अधिक आधुनिक, फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेश सरकारने २०२६ हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली आहे. राज्य सरकार शेतीतून उत्पन्न वाढविण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तीन वर्षांचा रोडमॅप तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले..तसेच हवामान सहनशील आणि शाश्वत शेतीवर भर द्यावा. तृणधान्ये, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती, जैवविविधता संवर्धन आणि पारंपरिक शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याला देश आणि जागतिक पातळीवर ओळख मिळावी, यासाठी शेतीमध्ये संशोधन, नावीन्यपूर्ण आणि डिजिटलचा अधिक वापर केला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले आहे..शेतकऱ्यांना शेतीतील नवीन प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना देशातील प्रगतशील कृषी राज्ये, तसेच इस्रायल आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये अभ्यास दौऱ्यांवर पाठवावे. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि उत्पादन वाढविण्याच्या नवीन पद्धती शिकण्याची संधी मिळेल, असे मुख्यमंत्री यादव यांनी म्हंटले आहे..MP Agriculture Year 2026: मध्य प्रदेशात २०२६ हे कृषी वर्ष, शेतकरी इस्रायल, ब्राझीलला जाणार, शेती उत्पन्न वाढीवर भर.शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भरमुख्यमंत्री यादव यांनी कृषी यांत्रिकीकरण, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि अभ्यास दौरे, अन्न प्रक्रिया युनिट्स उभारणे, फलोत्पादन विस्तार आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीओ) स्थापना यावर भर देण्याची सूचना केली आहे. यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढणार नाही, तर ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे..शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, सूक्ष्म सिंचन, बाजारपेठांचे जाळे आणि शेतीमालास योग्य भाव मिळावा, यावरही त्यांनी जोर दिला आहे. पशुपालन, मत्स्योद्योग आणि हवामान अनुकूल शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले..फुलशेतीला प्रोत्साहनत्यांनी सर्व जिल्ह्यांत फुलशेतीला प्रोत्साहन देण्याचे निर्देशही दिले आहेत. २०२८ मध्ये होणारी आंतरराष्ट्रीय गुलाब स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भोपाळमध्ये आयोजित गुलाब महोत्सव आता राज्यस्तरीय फूल महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. उज्जैनमध्ये होणाऱ्या सिंहस्थ २०२८ च्या पार्श्वभूमीवर, १०० एकरवर फुलशेतीला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे..International Women Farmer Year: ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आशादायी.याशिवाय, त्यांनी अटल प्रोग्रेस-वे प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रादेशिक विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका बजावत असल्याच्या मुद्यावर त्यांनी भर दिला. या प्रकल्पामुळे दिल्ली-वडोदरा द्रुतगती आणि आग्रा-लखनौ महामार्गासह मोरेना, श्योपूर आणि भिंडदरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि यामुळे चंबळ प्रदेशाला मोठी चालना मिळेल. तसेच नवी दिल्ली, मुंबई, कोटा आणि कानपूर सारख्या शहरांकडे कमी वेळेत पोहोचता येईल. .यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि एकूणच गतिशीलतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या संमतीने जमीन संपादन करत प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.