Apple Ber : रसदार अॅपल बोरांना पसंती

Washi APMC Market : थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध हंगामी फळे येऊ लागतात. सध्या बाजारात हिरव्या-तांबूस रंगांची लहान-मोठ्या आकारातली बोरे दिसत आहेत.
Apple Ber
Apple BerAgrowon
Published on
Updated on

Washi News : थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध हंगामी फळे येऊ लागतात. सध्या बाजारात हिरव्या-तांबूस रंगांची लहान-मोठ्या आकारातली बोरे दिसत आहेत.

यामध्ये आकाराने मोठे आणि चकचकीत हिरव्या रंगाच्या ॲपल बोरांना ग्राहकांकडून मागणी आहे. सध्या वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात चमेली, उमराणा, कडाका यांच्यासोबतच ॲपल बोरेदेखील दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Apple Ber
Washi APMC : वाशी बाजार समितीत स्‍ट्रॉबेरी प्रतिकिलो ४५० रुपये

शुक्रवारी एपीएमसीत २२० क्विंटल बोरांची आवक झाली, ज्यामध्ये ॲपल बोरांची आवक ही जवळपास १०० ते १५० क्विंटल असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या सोलापूर, पंढरपूर या भागातून ॲपल बोरे दाखल झाली असून येत्या काही काळात गुजरातमधून बोरे बाजारात येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲपल बोरांची वैशिष्ट्ये

साधारण जूनमध्ये ॲपल बोरांची लागवड करण्यात येते; तर नोव्हेंबरपर्यंत फळे पूर्णपणे परिपक्व होऊन काढणीस तयार होतात. ॲपल बोर हे चमेली आणि उमराणा बोरांवर कलम संकरित करून तयार केली जातात. चवीला अतिशय गोड आणि आरोग्यास उत्तम मानले जाते.

बाजारात २०० ते २५० बॉक्स आले आहेत. काही वर्षांपासून शेतकरी अधिक नफ्याच्या दृष्टीने देशी बोरांपेक्षा ॲपल बोरांच्या शेतीकडे वळले आहे. ग्राहकांकडून देशी बोरांपेक्षा ॲपल बोरांना चांगली मागणी असून आतापर्यंत १०० ते १५० बॉक्स विकले आहेत.
- अविनाश हिंगे, व्यापारी, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com